पान:रामायणे भाग पहिला.pdf/१६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड] मंत्ररामायण. निर्भीति हे धंरा सुर करिती विविधक्रिया अनादि सती !; । मुदितस्वांतें शांतें, कांते ! हीं श्वापदादिकें दिसती ॥ ७९२ वंदावें गौत म मुनिकीर्तिस गोदावरीस भावानें; । तरलों विपेत्समुद्रीं, जीच्या तँटसेवनप्रभावानें ॥ शैशिजलज श्री जितमुखि ! तो हा नंग चित्रकूट, जेथ मला । ७९३ येउनि अर्पित होता भरत प्राथूनि मेदिनी कमला. ॥ ७९४ हीरैकेशिख रा भदति ! स्वैत्स्मितरुचिपुंजशुद्धतोयवहा । स्वंदलकनिभयमुनेशी संयुक्ता जान्हवी पहा भव्हा ॥ ७९५ या क्षितिवरि म पूर्वे, भँगीरथें आणिली महानाव । यास्तव हीचें लोकीं, प्रसिद्ध भागीरथी असें नांव ॥ ७९६ हे मम पूर्वज दत्ता, मौक्तिकैमालाचि होय पृथ्वीची; । हीच्या अँघगिर्यशनीं शोभति कुंदे॑र्दुकांति पृ॒थु वीची.॥७९७ सुंदरि ! गंगा यमुनासंगम हा हर्ष देतसे थोर; । ७९८ कर जोडुनि मिश्रितैंमुक्तामरकतमणिमयहारद्वयप्रभाचोर ॥ राज्ञि ! करी प्रणति, त्रिजगद्भवाब्धिनौकेला; । जीणें केपिलहताखिलसँगरसुतोद्धार तत्क्षणीं केला. ॥ ७९९ १५९ १. ब्राह्मण. २. आनंदितचित्तें. ३. हे सुंदरी. ४. भक्तिनें. ५. संकटसमुद्र. ६. तीरीं राहिल्याच्या योगानें. ७. चंद्र, कमल, यांची शोभा जिंकिली मुखें जीच्या अशी. ८. पर्वतविशेष हा प्रयागाजवळ आहे. येथें राम वनवासास जाण्यापूर्वी राहिला होता. ९. पृथ्वी, १०, संपत्ति ११. हिरकणीतुल्य दंत जीचे अशी. १२. तुझ्या हास्यकांतीतुल्य स्वच्छउदकें बाहणारी अशी. १३. तुझ्या केशतुल्य यमुनेशीं. १४. मिळाली. १५. गंगा. १६. संसारनाशिनी. १७. भगीरथराजाचे पूर्वज कपिलमुनीच्या कोपानें दग्ध झाले, तेन्हां त्यांस (सगराच्या साठहजार पुत्रांस) उद्धरण्यासाठी भगीरथानें महाप्रयत्रानें शि- बाला प्रसन्न करून त्याच्या मस्तकींची गंगा भूलोकी आणिली, म्हणून तिला येथें 'महानाव' म्हणजे तारण करणारी मोठी नौका असे म्हटले आहे. १८. मोठी नौका. १९. पूर्वजानें (भगीरथानें) दि. लेली. २०. मोत्यांची माळ. 'मुक्तावली कंठगतेव भूमेः' असें रघुवंशांत आहे ( स० १३ श्रो० ४८). २१. पापपर्वतभक्षण २२. कुंद, चंद्रवत् कांति ज्याची असा. २३. मोठ्या. २४. लाटा. २५. या संगमाचें वर्णन कालिदासानें रघुवंशाच्या तेराव्या सगीत (लो० ५४-५७) केलें आहे, तें ताडून पाह- ण्यालायक आहे. २६. मिश्रित मोत्यें व पाचू यांच्या दोन हारांची शोभाहारक. २७. नमन. २८. त्रैलो- क्यास संसारांतून तारणारी जी भागीरथी तिला. २९. कपिलानें मारले जे सर्व सगरराजाचे पुत्र त्यांचा उद्धार. ३०. सगर नामक राजानें अश्वमेध केला. तेव्हां त्यानें साठ हजार पुत्र बरोबर देऊन यज्ञसंबंधी अश्व सोडिला. तो इंद्रानें चोरून कपिलाच्या आश्रमांत नेऊन ठेविला. सगरपुत्र अश्वाचा