पान:रामायणे भाग पहिला.pdf/१६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोरोपंतकृत मातलिला विज योत्तर पूजुनि नौकासि पाठवी राम; तामरसप्रभवाला जैसा हर तो पुरत्रयविराम ॥ ७६२ तो दशकंठ य वीयान् प्रार्थी पूजावयास रामातें; । त्यास म्हणे प्रभु, ‘पूजन भरताविण नेष्ट वासरा ! मातें. ७६३ कपिसैन्यपू ज नानें पूजित मी, यांत अन्यथा नाहीं; । कैकेयीर्तन तूं जयधन बहु दिधलें, आतां इच्छा मनीं नसे कांहीं ॥७६४ य मला चिंतितसे जीवनादा॒दासीन; । वैल्की 'जेटी फैलाशी भूशायी दर्भसंस्तरासीन. ॥ ७६५ 'मँच्चित्तेकप रा तें जातों भेटावयासि भरतातें; । आज्ञा केली त्याचा, उतराया भूरि शोकभर तातें ॥ ७६६ हें रघुसत्त म वदतां, बिभीषणें सर्व पूजिली केंटकें । दिधलीं हौटकमणिमयसत्पदकें हरिकुंडलें केंटकें. ॥ ७६७ तैर्दुपरि तो श्री” दाचें पुष्पकयान क्षमासुतेशाला; । अर्पुनि म्हणे बिभीषण, 'याणें जावें वकीयदेशाला. '॥७६८ तेव्हां यॉनव रा वर सानुज सस्त्रीक रामभद्र चढे; । सैतैडिन्मेघाधिष्ठितरत्नाचलमौलिशींच साम्य घडे. ॥ ७६९ राज्याभिषेक म हसुखकाम गेंद्रराक्षसाधिप ते । म्हणती, 'आम्हांसहि ने साकेताला, समस्तलोकपते ! ॥७७० १. इंद्रसारथि याला. २. जयानंतर ३. स्वर्गासि. ४. ब्रह्मदेवाला. (तामरस म्ह० कमल त्यापासून प्रभव म्ह० उत्पत्ति आहे ज्याची तो.) त्रिपुरनाशाच्या समयीं हराचा (महादेवाचा) ब्रह्मदेव सारथी झाला होता, या कथेचा येथें संबंध दाखविला आहे. ५. त्रिपुरनाशक. ६. विभी- पण. ७. इष्ट नाहीं. ८. हे वत्सा. ९. भरत. १०. प्राणादिकी उदासीन. ११. वल्कलधारी. १२. जटाधारी, १३. फलभोजी. १४. भूमीवर निजणारा. १५. दर्भासनस्थ १६. माझ्याकडे ज्याचें सर्वस्वी मन गुंतलें आहे अशा (भरतातें). १७. बहुत. १८. सैन्यें. १९. सुवर्णखचित रत्रांचीं उत्तम पदकें. २०. कंठभूषणे आणि कर्णभूषणें. २१. कडीं. २२. त्यानंतर (पूजनानं- तर.) २३. कुबेराचें. २४. पुष्पकविमान हैं कुबेराचें होतें. रावणानें तें याजपासून जिंकून लंकेंत आणिलें तें आतां विभीषणानें रावणमरणोत्तर रामास दिलें. राम यांतच बसून परत अयोध्येस आला. नंतर त्यानें तें कुबेराकडे परत पाठविलें, यांत बसून जिकडे जाण्याची इच्छा करावी तिकडे तें बाई. २५. जानकीपति रामाला. २६. अयोध्येला. २७. पुष्पकावर. २८. धाकट्या भावासह. २९. विजेसहित मेघानें अधिष्ठिलेल्या मेरुशिखराशींच. ३०. राज्याभिषेको सवमुखेच्छु. ३१ सुमीवविभीषण. ३२. अयोध्येला ३३. सकलजनाधिपा हे रामा.