पान:रामायणे भाग पहिला.pdf/१६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड ] क्षितिकन्येस, म हीस, श्रीमदयोध्येस, कुलगुरूक्तीस, । पाळी जातिस सर्व, प्रजेस निजधर्मविप्रभक्तीस ॥ अस्थिरता जे श्री ची, ती तूझ्या शैत्रुजीवनीं राहो; । संतत कल्याण असो, त्रिपक्षलोकप्रतापरविराहो! ॥ ७५५ जे सोदरपौ रा तप्रधानजननीवसिष्ठमुख रामा ! । यांला प्राणासम तूं मानावें, सैद्गुणद्रुमारामा !" ॥ ७५६ ऐसें स्वहित मै नःप्रिय ऐकुनि, सीतापती करी मान्य; । मंत्ररामायण. १५५. ७५४ मग सकळांसि विचारुनि, गेला स्वर्गासि तो जैगन्मान्य ॥ ॠक्षप्लवंग जन जो, मृत तो रामप्रियार्थ देवेशें' । उठवीतां, पूर्वस्थिति नेणुनि, गर्जे रैणस्पृहावेशें. | ७५८ सुरजन जय जयशब्दें गर्जति, वाद्ये अनेक वाजविती; । पुष्पांहीं वर्षर्तुसि, चपलांसि वैरॉप्सराहि लाजविती ॥ ७५९ 'सौंद्रानंदभ रा ने तेव्हां प्रवद्रसंघ ते लवले; । लैव लेखैर्षिस्थांतीं दुःख नसे, तौपदीप मालवले. ॥ ७६० भर्गादिक अ म र सुखें स्वर्गा गेले पुसोनि रामाला; । रघुपतिगुणमुक्तांची शोभे सर्वाचिया गेळां माला. ॥ ७६१ १. अस्थिरत्व २. शत्रूच्या जीवितांमध्यें. ३. हे शत्रुप्रतापसूर्यमासक. ४. बंधु, पुरवासी लोक, आप्त, प्रधान, माता, वसिष्ठप्रमुख जे त्यांला. ५. सुगुणवृक्षाच्या बागा. ६. असें दशरथाचें वचन. ( रामायण, युद्धकांड, स० ११९ श्रो० १३-२३ हे पंतांच्या प्रस्तुत वर्णनाशीं ताडून पाहण्यालायक आहेत.) ७. मनाला आवडणारें. ८. दशरथ. ९. जगत्पूज्य १० आस्थलवानर ११. रामाला बरें वाटावें यास्तव त्याच्या प्रार्थनेवरून इंद्रानें मृतवानरादि बनास सप्राण केलें. १२. इंद्रे १३. यु द्धेच्छेच्या आवेशानें. १४. पर्जन्यकालासी. १५. विजांसी. १६. श्रेष्ठ देववेश्याही. (अप्सरा ह्या स मुद्रमंथनकाळी अप् म्ह० उदक यापासून उत्पन्न झाल्या:-'अप्सु निर्मथनादेव रसात्तस्माद्वरस्त्रियः । उत्पेतुर्मनुज श्रेष्ठ तस्मादप्सरसोऽभवन् ॥' ह्या गंधर्वोगना असून स्वर्वेश्या आहेत. ह्या इंद्राच्या दासी असून त्याला कोणाच्या तपाचें भय वाटलें म्हणजे तपोभंग करण्याच्या कामी मोठ्या कुशल, म्हणून त्याच्या आज्ञेनें ह्याच जावयाच्या आणि कार्यसिद्धि करून परत यावयाच्या उर्वशी, मेनका, रंभा, घृताची, तिलोत्तमा, सुकेशी, मंजुघोषा इत्यादि प्रमुख सुरवेश्या होत. बाणकवीनें यांचीं चवदा कुळें असल्याविषयींचा उल्लेख कादंबरीग्रंथांत केला आहे. अप्सरा आपल्या नृत्यविलसितानें विजांस लाज आणतात.) १७. अतिहर्षाच्या भारानें १८. वानरसमूह १९. दडपून गेले. २०. किंचित् २१. देवर्षिचित्तीं. २२. संतापरूप दीप. २३. शिवादिक. २४. रामाच्या गुणरूप मोत्यांची. २५. रामाची सर्व स्तुति करूं लागले, असा भावार्थ,