पान:रामायणे भाग पहिला.pdf/१५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

● १५० मोरोपंतकृत तो सुविचित्र श्री शर झाला देशकंठहच्छिलैकघन; । रामयशःक्षीरधिविधु सुरसंघमनोमयूरहर्षघन ॥ ७०३ राघातें भिन्नहृदय तो पडे गैतप्राण; । रिपुंजीवनधन घेउनि, पुनरपि तूणीं प्रवेशला बाण ॥ ७०४ म हासुर पडतां सेवनाकरा धैरा सौरी । कांपे चळचळ, नसतां नौविक 'अनिलें जलीं 'तैरीसारी. ७०५ रावणतनु ज गतीवर, रामावर देवपुष्पवृष्टि गळे; । बॉ०वें निशाचरांचे अमरांचे जाहले निरुद्ध 'गळे. ॥ ७०६ 'रैघुनाथो ज य ति' असें गर्जति सुरसिद्ध, हर्षले सर्व; । दुंदुभि वाजति, नाचति वैरीप्सरा, कीर्ति गाति गंधर्व ॥७०७ राक्षसतिमि रा पहरघुराजयशश्चंद्रचंद्रिकाजालें । सुप्रभ दिन तौंपविवर्जित भुवन, प्रेकटसुधापूर्णकुंभसें झालें ॥ ७०८ मणि झाला, अतिशीतल मंद गंधैवह वाहे; । त्यो पर्वी ब्रह्मांड प्रभुकीर्तिक्षीरसागरीं नहे. ॥ सर्व कपि प्रां जें लि ते स्तविती रामास शर्मधामास; । गाती नाचति भेटति शत्रुबिरामास पूर्णकामास. ॥ तेव्हां सविन य वंदी बिभीषण प्रेमपूर्ण देवास; । रघुवीरश विगतप्राण ७०९ ७१०. उठवुनि निजभक्तातें भुजांतरी रामचंद्र दे वाँस ॥ त्याला रघुरा ज म्हणे, 'स्वबंधुच्या परलौकिकासि करीं; । क्षाळी विवेकॅनीरें, साप्तांचा शोकैकदम स्वकरीं ॥ ७१२ १. विलक्षण तेजस्वी. २. रावणहृदयशिलेस घण. ३. रामकीर्तिसमुद्रास चंद्ररूप. ४. देव- समूहमनोमयूरास हर्षकारी मेघच. ५. मृत. ६. शत्रुजीवितरूप धन. ७. भात्यांत. ८. आपलें इष्ट कार्य करून नंतर स्वस्थळीं पुन: गेला, असा भाव. ९. अरण्यें आणि खाणी यांसहित १०. पृथ्वी ११. सगळी. १२. नावाडी १३. वायूनें. १४. नावेसारखी. १५. आनंदवाष्पांनी अमरांचे आणि दुःखबापांनीं निशाचरांचे गळे बंद झाले. १६. कंठ. १७. राम जय पावतो. १८. स्वर्गातील श्रेष्ठ वेश्या. जालानें. २०. दुःखहीन. २१. स्पअमृतपूर्णकलशतुल्य. २२. तेजस्वी. २३. सूर्य. २४. वायु. २५. त्या प्रसंगीं. २६. ब्रह्मगोल, चतुर्दशभुवनात्मक प्रदेश. २७. रामकीर्तिरूप क्षीरसागरीं. २८, स्नान करी. २९, हात जोडलेले. ३०. सुखस्थानास. ३१. शत्रुनाशकास. ३२. ज्याचा मनो- रथ पूर्ण झाला आहे अशा (रामास). ३३. नम्रतेनें युक्त असा. ३४. दोहों वाहूंमध्यें. ३५. स्थान. (आलिंगन.) ३६. उत्तरकार्यातें, और्ध्वदेहिक कार्यातें. ३७. विचाररूप उदकानें.३८. स्वकीयजनांचा. ३९. शोकरूप चिखल, १९. राक्षसांधकारनाशकरामकीर्तिरूप चंद्राच्या चांदण्याच्या ७११