पान:रामायणे भाग पहिला.pdf/१५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४८ मोरोपंतकृत आतां तुला पेरा सु क्षणांत करितों.' असें वदोनि खळ । सोडी शूल, तदा प्रभु खंडी हरिशक्तिनेंचि तें निखळ.६८२ बाणें छेदुनि मर्मी केला सिंदूरपर्वतावाणी; । तेव्हां 'जयति श्रीमान् राम' अशी जन्मली नभीं वाणी. ६८३ दशवदनें जै यकामें सोडुनि शरपंक्तिला अहीनेला । शोणितवार्षिघनाच्या तुळेशि खरवायुचा अंही नेला. ॥६८४ य परवश, उत्पातहि फार पावले जैनन; । भ जन न करिति जयनिश्चय, म्हणती, 'भासे भविष्य आज नन.' ॥ राम म्हणे, 'तुज असतें बळ, जरि मजसीं करावयास रण; । तरि जैनकसुताहरणीं धरिलेंशि किंमर्थ तस्कराचरण ||६८६ तुज निःसंश य काळें विलोकिलें, म्हणुनि मूढ झालास; । ज्याच्या समीप यम ये, तो मानी सत्य इंद्रजालास.' ॥ ६८७ ऐसें वदोनि राघव तीव्रेशराचा क्षणे करूनि पेट; । पौपादर्शनकामें झांकी जाणों स्वशत्रुला निपट || वानरही द्रुम शिखरें आच्छादिति यक्षपत्यवरजाला; । जौलावृत मत्स्य जसा, तैसा दशकंठ भासता झाला. ॥ ६८९ मूर्छित नेष्टें श्री तो सारथिनें राक्षसेंद्र पळवीला; । लवंगबले सिंहरवें जय कैलासीं शिवासि कळवीला ॥ ६९० संज्ञा पावुनि रा में रावण निंदी स्वकीयसारथिला; । त्याणें 'मूर्च्छितरथिला रक्षावें' हा स्वधर्म संकथिला ॥ ६९१ पुनरपि से म राकांक्षी रावण येतां, अगस्त्यमुनि सदय । रघुनाथाला शिकवी येउनि, जयकारि भानुचें हृदय ॥६९२ झाले सुर १. गतप्राण, २. इंद्रशक्तिनेंचि ३. निर्भल, निखालस, ४. शेंदूराच्या पर्वतासारखा. ५. जये- च्छु. ६. श्रेष्ठेला. ७. रक्तव मेघाच्या. ८. समतेला. ९. खरराक्षसवायूचा. १०. सर्प. (राम.) ११. भयाक्रांत. १२. धरणीकंप, उल्कापात, इत्यादि अशुभसूचक अद्भुत प्रकार. १३. जन्म. १४. सीतेला नेण्याच्या काम. १५. कशास्तव. १६. चोराचें आचरण. १७. मृत्यु १८ आहे तें न दिसावें आणि नाहीं तें दिसावें ज्याणें अशी विद्या, माया, दृष्टिमोह. १९. तीक्ष्ण बाणांचा. २०. पडदा. २१. दुष्टाचें दर्शन होऊं नये या बुद्धीनें. २२. रावणाला. (यक्षपतीचा म्ह० कुबेराचा अवरज म्ह० कुनिष्ठ बंधु, रावण.) २३. जाळ्यांत सांपडलेला. २४. गतलक्ष्मीक. २५. वानरसैन्यानें. २६. सिंहनादें. २७. सावधपणा, चेतना. २८. सांगितला. २९. युद्धेच्छु. ३०. 'आदित्यहृदय' या नांवाचें स्तोत्र ( रामायण, युद्धकांड, स० १०५ श्रो० ३-२७ पहा.)