पान:रामायणे भाग पहिला.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२. नामांकरामायण. ४२ ४३ ४५ मर्त्याशन, बेरमत्त, क्षैणदाचरराज, दशमुख, द्वेषी. ॥ रावण संहाराया, श्रीहि कपटकनकहरिणलोभ घरी; । मनुकुलतिलका प्रार्थी; त्यामागें प्रभुहि जाय, जेविं हेरी ॥ रानांत दूर पळतां प्रभु कपटमृगासि खैरशरें हाणी. | मर्महतहि 'हा सीते! हा सौमित्रे !' अशी वदे वाणी ॥ राणी, प्रभुची वाणी मानुनि, भी, लक्ष्मणा म्हणे, 'स्वामी! । मरणव्यसनीं रक्षीं; तुज पत्यसुदान मागतें बा ! मी.' ॥ राघव म्हणे, 'सखि ! रहा स्वस्था; भी न रघुसत्तमा यावी । मथिला बहुधा प्रभुनें तो कनककुरंग मत्त मायावी.' ॥ राग करी, कटु बोले, डेंटजांतुनि घालवी तया आर्या । मंधुभित्प्रभुची भार्या; सिद्ध कराया सुरांचिया कार्या ॥ रावण तोंचि, सर्दुटज शिरुनि, हरी श्रीस; जड म्हणे, 'आजी । मत्सम मीच; जयश्री मेळविली सहज न करितां औजी.' ॥ राहु सुरैयशोविधुचा तो खळ केला जटायुनें भग्न. । मग तेणेंही, अनयें पक्ष च्छेदूनि, कॅरेमलीं मग्न. ॥ राजसुता, गगनपथें नेता, लंधूनि ऋष्यमूकनग, । मर्कटपंचक पाहे; सोडी ती त्यांत सोतरीय नंग. ॥ राक्षस लंकेमध्यें रोधी सीता सती अशोकवनीं । मणिकी रैसे गंगेचा, तेविं कथेचाचि या असो कवनीं. ॥ राम मनुष्यतनु प्रभु परते, मृग वधुनि, तों, अनुज कथि, तें । मँहिजोक्त श्रवण करुनि, धांवत उटजासि ये, मनें व्यथितें ॥ रामा उटजीं न दिसे, 'हाय !' म्हणे, स्त्रैणैसा विलाप करी । 'मदिराक्षि ! हाय! कोठे आहेस ?" म्हणे; वरीच शोक धरी. ॥ रानीं हुडकी स्त्रीतें प्राकृतसा, तों जटायुला पाहे । मरणोन्मुखाहि वदवी, न दशाननपापकृत्य तें साहे. ॥ ४६ ४९ ५० ५१ ९ ४० ४४ ४७ ४८ ५२ १. मनुष्यांस खाणारा. २. वरप्राप्तीने माजलेला. ३. राक्षसराज, ४. रामाला ५. सिंह. ६. तीक्ष्ण शरानें, ७. भय पावे. ८. पतीचें प्राणदान. ९. लक्ष्मण १०. पर्णशालेंतून. ११. म धुदैत्य मारणाऱ्याची म्ह० रामाची. १२. उत्तम पर्णशालेत. १३. युद्ध. १४. देवांच्या यशोरूप चंद्राचा. १५. मूछँत. १६. उत्तरीयवासह. १७. दागिने. १८. मडक्यांत. १९. (गंगापक्षी) उदक; (कथापक्षी) गोडी, २०, सीतेचें भाषण, २२. स्त्री. (सीता) २२. स्त्रीलंपटसा.