पान:रामायणे भाग पहिला.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोरोपं तकृत राघव सानुज गुरुनें दूत प्रेषूनि शीघ्र आणविला; । मन्युद अनर्थहि तिणें, हर्षद मानुनि, सुतासि जाणविला. ॥ राग करी मातेवरि, करुनि पित्याची क्रिया, निघे तूर्ण; । मेघव्या भय दे, प्रभुला भेटे, व्हाया स्वकाम तो पूर्ण ॥ राजासि तोय देउनि, समजावी राम आशु भरतातें, । मधुर वदे, सच्चित्तां जें पूर्ण करी, न बा ! शुभरता तें. ॥ 'राहोंदे मज चवदा वर्षे, पितृसत्यरक्षणा, रानीं । महिमा तुझाहि गावा ताताचें वचन रक्षणारांनीं.' ॥ राष्ट्रावनासि मागुनि घे प्रभुच्या पादुका, शिरीं वाहे । मरणद समयादर्शन कथुनि, समावृत्त, पुरनिकट राहे ॥ राक्षसकदनार्थ निघे श्रीरामहि, चित्रकूट सोडून । मँह बहु देता झाला अत्र्यनुसूयांसि, हस्त जोडून. ॥ रानीं विराधराक्षस सीतेसि धरी, हरी, देरीवदन; । मत्ता तया मथुनि, दे पदा नमितयाहि सुमतिचें सदन ॥ रात्रिंचरभीतिरहित दंडकवन करुनि, हरुनि ताप, सजे, । मदनांतकसा, द्याया गति त्यांस, सुपथ धरूनि तापस जे. ॥ राजा गृध्रांचा जो, तातप्रियसख, जटायु, तो तात । मग्नचि सुखांत केला; हें यश गाते तसेच होतात. ॥ राहे गोदातीरीं प्रभु, पंचवटींत, रचुनि दैलेशाला; । भत्ता खेचरी लोभे त्यासि, शुंनी जेवि अमृतकलशाला ॥ रागें कर्ण घाण छेदी लक्ष्मण कृती, तिला दंडी. । मंदिरात्रप खर बंधु प्रेरी प्रभुच्या वधास ती चंडी ॥ राक्षस शूर्पणखेचे कैवारी मारितां रणीं, दुष्टा । महदप्रिय दशवदना कळवी ती, परम दारुणा, रुष्टा ॥ राख स्वकुळ कराया, कपटकनकमुग निशाचर प्रेषी । २८ २९ ° a ३२ ३३ ३४ ३९ १. भरत. २. दु:खदायक. ३. कैकेयीनें. ४. शीघ्र. ५. इंद्राला. (भरताचें मोठे सैन्य पाहून हा आपले राज्य घ्यावयास येतो काय असे त्यास भय पडलें असा भावार्थ.) ६. लवकर. ७. राज्यर क्षणार्थ, ८ माघारा फिरलेला. ९. राक्षसनाशार्थ १०. आनंद. ११. गुहेसारिखें मुख ज्याचें असा. १२. राक्षस. १३. पर्णशाला. १४. राक्षसी. (शूर्पणखा.) १५. कुत्री. १६. मद्य व रक्त पिणारा. १७. कोपिष्ट स्त्री. १८. अतिशय वाईट वर्तमान १९. कोयुक्ता