पान:रामायणे भाग पहिला.pdf/१४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४० मोरोपंतकृत तेव्हां जयज य शब्दें गर्जति मुनि सिद्ध देव गंधर्वः । पर्व अपूर्व तयांला झालें; आनंद पावले सर्व ॥ ते दुंदुभि वा ज विती, धिमिधिमिधिमि देवलोक आनंदें; । गंधर्व करिति तननन; तत्थैथैथय्य अप्सरोवृंदें. ॥ तो प्रावृट्सम य' गमे, पुष्पांची वृष्टि, वाजती भेरी;। चैपला सुरांगना त्या तन्वंगी नाचती नभीं गौरी ॥ ५९६ जाउनि रघु रा याच्या चरणीं सौमित्रि जाहला लीन; । पीनँभुज प्रभु हृदयीं आलिंगी बंधुला दयाधीन. ॥ ५९७ रामम्हणे, 'श्र म झाला वत्सा ! तुज नाहलासि रुधिराहीं; । द्वगुलही स्थळ देहीं रिपुबाणांहीं न चुंबिलें नाहीं. ॥ १९८ तुजविण जे श्री स्त्री तनु, हें सारें सर्वथा मला वमनः । सांगुनियां कुंशलाला, चिंतीतटिनीतटास लाव मन. ॥ ५९९ तेव्हां रघुवी रा ला नमुनि म्हणे तो देशाननानुजनी, । 'तुज नीरैदाभदेहा जय झाला, 'धैर्मशर्महेतु जनीं ॥ ६०० रावणपुत्र म हेंद्रद्वेष्टा दुष्टाग्रणी रणीं सवल । सौमित्रिनें, त्रिनेत्रें अंकसा मर्दिला प्रभो ! सबैल. ॥ ६०१ याच्या निर्जंभुज भुजगें शरदंष्ट्र कार्मुकाननें सकळ । दंश करुनियां शत्रु क्षितिष्ठीं आज पाडिले विकळ ॥६०२ ऐसी स्वविज य वार्ता, ऐकुनि राजा म्हणे, 'अहो ! मातें । सर्वांहीं तोपविलें, करुनि शराग्नींत शत्रुहोमातें ॥ ६०३ चिंतांबुधिती रा ला पावायाला मला तुम्हीं सेतू ; । हे तुमचे बलशाली भुज भेद्रे असोत नित्य जयहेतू. ॥ ६०४ रामें असे स म स्तहि सत्कारुनियां, सुषेणकौशल्यें । सौमित्रिप्रमुखांचीं काढविलीं मर्मपीडकें शैल्यें ॥ रावण तेनु ज विनाशें भिजवी बाष्पोदकें सुहृद्धस्त; । ध्वस्तप्रभ तो झाला गेभस्तिमाली जसा तमोग्रस्त ॥ ६०६ ५९४ ५९५ १. अप्सरांचे समूह. २. वर्षाकाळ. ३. नौवद. ४. विक्रता. ५. देवांगना. ६. स्त्रिया. ७.पु- टवाहु. ८. दोन बोटेंही. ९. कल्याण, क्षेम. १०. चिंतानदीतीरास. ११. विभीषण. १२. मेघतुल्यदेहा. १३. धर्मसुखहेतु. १४. बलवान्. १५. ससैन्य. १६. स्ववाहुसपैं. १७. बाणदंष्ट्रा ज्याची. १८. धनु मुख ज्याचें. १९. पृथ्वीवर. २०. अरिगणाच्या यज्ञातें. २१. चिंतासमुद्रतीराला. २२. सुखी. २३. बाणा. २४. इंद्रजिन्नाशें २५. नेत्रोदकें २६. आतांचे म्ह० मित्रांचे हात. २७. निस्तेज. २८. सूर्य. २९. राहूनें ग्रासिलेला.