पान:रामायणे भाग पहिला.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२. नामांकरामायण. १८ राज्ञी तसेंचि करि ती; मागे वर; सत्यसादरा अडवी. । मथुरतमाहि तिची माते, ती झाली, लोभदूषिता, कडवी. ॥ राहे यत्न नृपाचा; सीतालक्ष्मणसमेत राम निघे. । मतिमान, गुरुवचनावन सर्वसुखाधिक, असें बरा मनि घे ॥ राहवि अभिषेका ती, घे वस्त्रे, प्रभुसि वैल्कलें ओपी. । मग, 'सेवा भरताहुनि मातें' प्रभुवर म्हणे, 'दिली सोपी.' ॥ राजासि राम वंदुनि, सर्वगुरुजनांसि जाय उत्साहें । महिषीगृहासि; राजा धरि भय, करितील लोक कुत्सा, हें ॥ राजा सुमंत्र धाडी; तो स्वामिरथीं तिघांजणां वाहे; । मरता सर्वहि शोकें, प्रभु करुण म्हणोनि, सासु जन राहे ॥ रानट निषेद गुह, परि परम प्रेमळ सखा तया भेटे । मरुदागमें दहनसा, वनवासें शोक तन्मनीं पेटे. ॥ राजीवनयन सानुज, मागुनि वटवृक्षपय, जटा बांधी। मस्तक संकपर्द तसें तें न विमोहील साधुची कां धी? ॥ राजभजन सचिवा हित न गमे, प्रभु उचित जाणवी, तरि तें. । मन करि विकल गुहाचें, जेव्हां जगदीश आणवी 'तैरितें ॥ २२ राशि जगद्भव्याची जी गंगा, प्रभु तितें उतरला, हो ! । १९ २४. मग त्या म्हणे गुहातें, 'येतों बा ! न तब धी सुतरला "हो.' ॥ २३ राजसखभरद्वाजा सानुज, सस्त्रीक, राम, येऊन, । मत्स्यवर जसा डोहा, भेटे; सानंद होय सेवून ॥ राकानाथ चकोरा, राम तसा चित्रकूटवासिजना, । मधु जेवि मक्षिकांच्या, 'मुनिराजीच्या तसाचि होय, मना. ॥ राहे सुमंत्र; भेटे तो महिषीच्या भजोनि गेहातें; । महिला वियोग नृप दे, त्यजुनि, म्हणत 'राम राम' देहातें ॥ २६ २५ राखा यांचा जातां, झालें गोकुळ जसें, तसें पुर तें. । मरुशोक, श्रीगुरुनयघन; जीवन अन्यथा कसें उरतें? ॥ २० २७ १. कैकेयी. २. अत्यंत मधुर. ३. गुरुवचनाचें पालन. ४. वृक्षाच्या साली. ५. राणी कौस- ल्या इच्या गृहास. ६. निंदा. ७. या नांवाचा प्रधान. ८. दयाळु. ९, सप्राण. १०. कोळी. ११. वायूच्या येण्यानें १२ जटाजूटयुक्त. १३. नौकेतें. १४. जगाच्या कल्याणाची. १५. अत्यंत चं- चला. १६. होवो. १७. चंद्र. १८. ऋषिपंक्तीच्या १९ पृथ्वीला. २०. रक्षणकर्ता. २१. पुराचा. २२. श्रीगुरु जो तोच नीतिरूप मेघ.