पान:रामायणे भाग पहिला.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड] मंत्ररामायण. सदयहृद य तूं कोण ? स्वाख्या बद' या परी पुसे राम; । हा मग म्हणे, 'तुझा मी सखा, गरुड हें प्रसिद्ध मन्नाम.' ॥ आलिंगुनि भु ज युगुलें, दोघांशि म्हणे, 'स्त्रशत्रु माराल; । कारालयगत 'निर्जर सोडवुनि स्वाप्तलोक ताराल.' ॥ ३८७ ऐसें खगना य क तो वदोनि घेऊनि राघवाज्ञेला, । गेला; जैयशब्द तदा हर्षे कपिसैन्यसागरें केला. ॥ ३८८ पुनरपि ते रा गानें जाउनि, गुंडराशिला "पिपीलिकसे; । लंका व्यापुनि म्हणती, 'खल हो! अद्यापि वांचलेत कसे ? ॥ पाषाणतृण म हीरुहधूलीनें भरुनियां मैहापरिखा; । 'हेरि खाणिती पुरीतें नखदंतांहीं धरोनियां 'हैरिखा ॥ ३९० ' कैपिनिनदें श्री दानुज पावे तात्काल मृत्युची शंका; । आँतंकाकुल झाला, 'हॅरिसैन्ये वेष्टिली जशी लंका ॥ ३९१ अतुलबली रा घव तो आला सेनेकरूनि संयुक्त; । 'अहिपाशांपासुनियां सौमित्रीसहित जाहला मुक्त. ॥ ३९२ दशमुख हें म हदप्रिय, ऐकुनियां, फार जाहला खिन्न; । स्विन्नेतनू नैतकंधर सस्त्रोत जसा महीध्र वैविभिन्न ॥ ३९३ राघवपरा ज यास्तव धाडी धूम्राक्षनाम रणदक्षः । दक्षघ्नावरि अंधक, तेंवि जयाचे प्रवीर बहुलक्ष. ॥ ३९४ जेंवि धनंजय विपिनीं २७, कपिसैन्यामाजि तो तसा गमला; । गिरिशिखैरकरकमारुतिघनाघनेंकरुनियां रणीं शेमला. ॥ ३९५ तदनंतर राक्षसवरवचनानें वज्रदंष्ट्रनाम रण | प्लवगासह करुनि बळे, अंगदहस्तेंचि पावला मरण. ॥ ३९६ १२१ १. स्वनाम. २. बाहुद्वयें. ३. बंदिशाळेतील. ४. देव. ५. स्वजन. ६. गरुड. ७. जयध्वनि, ८. गुळाच्या राशीला. ९. मुंग्यांसारखे. १०. दगड, गवत, वृक्ष, धूळ, यांनीं. ११. मोठे खंदक. .१२. वानर १३. हर्षा १४. वानरशब्दें. १५. रावण १६. भयपीडित १७. वानरसैन्यें. १८. सर्पपाशांपासून. १९.धर्मयुक्त देह. २०. अधोमुख. २१. प्रवाहयुक्त. २२. पर्वत. २३. वज्रभिन्न. २४. शिवावर आपली बायको सती हिचा तिच्या बापानें (दक्षानें) अपमान केला म्हणून शिवानें त्याचें शिर वीरभद्राकरवीं तोडविलें, यास्तव शिवास 'दक्षघ्न' म्हटले आहे. २५. दैत्य विशेष. याच्या रक्तापासून दुसरे अंधक उत्पन्न होत. या अंधकाचें महादेवाशीं अवंति देशांत मोठें घोर युद्ध झालें. २६. अग्नि. २७. वनीं. २८. पर्वतशिखरें, गारा, मारुति, वृष्टि करणारा मेघ, यांच्या योगें. . २९. विझला. (मेला.) १६