पान:रामायणे भाग पहिला.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११४ मोरोपंतकृत यापरि तुज राजेंद्रे कथिलें, आतां करूं नको उशिर; । सीतोपायन घेउनि, ठेवीं, ये तेत्पदांबुजीं स्वशिर ॥ ३०५ तूं करुनि स म र, न मर; भ्रमरसम रैघूत्तमांघ्रिनवपर्धी, । रम, रस घे, अमरचि हो, भ्रमरहित स्वस्थ नांद निजसमीं ॥ दे उत्तर, निज लासा, बहिरासा, मूकसा, नको राहूं; । याहुनि हित काय वदों? न वदसि कां आम्झुनीहि चोरा ! हूं.।। अनल अनिलय म यक्षप वरुण विधु ब्रन सर्प गंधर्व; । सर्व पराजित केले, परि रामाशीं करूं नको गर्व ॥ ३०८ राम प्रणत ज नांचा त्राता, रिपुलोककाल यापाशीं । चेष्टा करितां दुष्टा! भ्रष्टा ! पडशील मृत्युच्या पाशीं ॥ ३०९ राम धनंज य, तूं ही कापुर तृण तूल काष्ठ घृत तैल; । 'शैलहि पिंचविल, हे तुज नुमजे, तूं मातला जसा बैल. ॥ ३१० यतिवेपें चो रा नें, बाटवुनी रामचंद्रदलकुटिला, । 'कुटिलानें रैनातें नेलें, तो शत्रु पाहिजे 'कुँटिला ॥ ३११ गिरिदैलेन म स्तकानें, स्वॅशिरोभंगार्थ दुर्मते ! करिशी; । 'कॅरिशील तूं मदांधा ! नरकपुरी इच्छितोशि लौकरिशी.३१२ तूं मुकलासि श्री स्त्रीसौख्ययशःप्राणपुत्रमित्रातें; । ओमौर्ध्वदेहिकातें तरि करेिं, तुज कोण या जनीं त्रातें ?? ॥ ऐसें ऐकुनि रागें, दशकंठ म्हणे, 'धरा धरा धांवा; । हा धृष्ट पुष्ट मर्कट मारुनि हिरवाचि खा, न रांधौवा.' ॥ ३१४ ते सचिवाध म चौघे धरिती तोरातनूजदोर्दंड; । ते दंडिती गिरीतें, प्रहार करितात काय वेतंडे ? ॥ ३१५ अंगद अंडे ज वरसा, वरसामध्यें उडोनि भुज झाडी; । पाडी प्रांसादासह सचिवांतें, मृत्युच्या घरा धाडी. ॥ ३१६ १. सीतारूप नजराणा. २. रामचरणकमली. ३. रामपदरूप नवीन कमली. ४. स्वगृहीं. ५. अग्नि, वायु, यम, कुवेर, वरुण, चंद्र, सूर्य, सर्प, गंधर्व. ६. शरणागताचा. ७. अग्नि. ८. कापूस. ९. पर्वतही. १०. जाळून रक्षा करील. ११. रामपर्णशालेला. १२. दुऐं. १३. सीतारूप रत्नातें १४. मारिला १५. पर्वत फोडणे. १६. स्वमस्तकभंगार्थ १७. हत्तीसारिखा स्वभाव ज्याचा असा. १८. सव्वर १९. स्वकीय उत्तरकार्यातें. २०. दांडगा. २१. शिजवावा. २२. अं गदवाहु. २३. गज २४. गरुडासारखा. २५. वाड्यासहवर्तमान