पान:रामायणे भाग पहिला.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११२ मोरोपंतकृत गाढे ते निर्भ य कपि, असुरांचे भंगिती बळें बाडे; | झालें तें लंकेचें केंटक कैटक, कंटकट क्षणें वाढे. ॥ २८२ राजनीतिप्रवीण तो अंगदासि दूतत्वें । सवेंकरून धाडी, निज रिपुपाशीं, कथूनियां तेंवें ॥ २८३ तो अंगद न य निपुण प्रभुला वंदूनि जाय लंकेला; । केला प्रवेश रावणसभेत, सोडूनि भीतिशंकेला ॥ २८४ सारे मदांध राक्षस कुंजर, शिरला अशांत हंरितोक; । 'हँरितो कवण तयाला ? झाला तो चित्रतुल्य रिपुलोक. ॥ २ अंगद म्हणे म नीं, 'जरि न वदावें न पुसतां असें आहे; । बाहेर तें असो मत, कार्यार्थ अधिष्टिली खलसभा हे || २८६ हा दशकंठ श्री मदमत्त, न मद यासमान ऑसव दे; । कार्यार्थ मी वदावें करूनि ऐसा विचार यास वदे ॥ २८७ 'हे त्रिचर राजा ! रामाचा दूत 'अंगदाभिध मी; । कोणी मला पुसाना, कोण असें, काय बैसलों अधमीं ॥ २८८ वैदेहीच्या 'रेम णें वीरें करुणाकरें जगद्गीतें, । पाठविलें मज, त्याच्या ऐकें कैल्याणहेतु सद्गीतें. ॥ २८९ ज गदीश्वर, त्याचा तूं पौत्रॆ भूतपतिदास, । चतुरानन श्रुतसंपन्न, नयज्ञ, ब्राह्मणसुत, पावलासि सुपदास. ॥ २९० य त्नानें पूजावे, धर्मसेतु रक्षावे; । सुरभूसुर निर्मल यश जोडावें, व्यसनानाचार ते उपेक्षावे. ॥ २९१ या विहिताचा रा तें, सोडुनि धरिलीस वृत्ति जननीचा; । अनुसरलासि दशास्या! पक्षाला तूं वैकीयजननीच्या ॥ २९२ ● १. मजबूद, बलाढ्य. २. मंदिरें. ३. तें कटक (सैन्य) लंकेचें कटक (वलय) झालें. ४. सैन्य. ५. वलय (वेढा.) ६. कलह ७, सार, मुख्यांश. ८. हत्ती. ९. सिंहबालक. १०. निवारितो. ११. स्वकार्यासाठीं. १२. आश्रयिली. १३. लक्ष्मीच्या मदानें माजलेला. १४. मद्य. १५. राक्ष- साधिपा. १६. अंगदनामक. १७. नीचांत. १८. सीतेच्या. १९. पतीनें. २०. हितकारक. २१. उत्तम वाणीतें. २२. ब्रह्मा २३. नातू. पुलस्त्यऋषीचा पौत्र आणि विश्रवाऋषीचा पुत्र, २४. शिवभक्त २५. शास्त्रसंपन्न. २६. देव ब्राह्मण २७. धर्ममर्यादा २८ जनांत निंद्य असी. २९. स्वमातेच्या याची माता कैकसी ही सुमाली नामक राक्षसाची कन्या.