पान:रामायणे भाग पहिला.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२. नामांकरामायण. ३९ शतमस्तक खंडुनि वधि सूर्यबरें, होय यश जगीं शुद्ध ॥ वर्मुनि पुष्पें, प्रभुतें वर्णिति, जय नारदप्रमुख गाती । अतिधवला कीर्ति शिवा लोपवि, कबळून, हंससुखगा, ती ॥ ४० शतमख उठवी वानर, दिव्य करी श्री, पिताहि दे भेट. । प्रभुयश भवार्णवीं हें सेतु, न नौका, तसें नव्हे बेट. ॥ र्षण्मुखजन कसखाचें पुष्पकनामक विमान या वाहे । ४२ ४३ प्रभु, त्यातें वैसोनि, श्रीसेत्वाद्यखिल कौतुकें पाहे. ॥ ससुगल बिभीषण प्रभु निजजय, मारुतिमुखें, प्रथम कळवी. । मग सानुज भरतातें भेटुनि, तत्ताप सकळही पळवी. ॥ हर्षवि, राजा होउनि, भरता, सुगला, बिभीषणा, राम । मारुतिस भव्य वर दे, पूर्ण करी सर्वभक्तजनकाम. ॥ क्षयकर विप्रांचा जो, त्या लवणातें अरिघ्नही मारी । भरत वधी कोटित्रय गंधर्व, प्रभु असा जगा तारी ॥ ज्ञहि अज्ञहि जन तारी नामें, कामादिशत्रुही मारी । स्वयरों भवभय वारी, करि भक्तमयूरधन दया भारी ॥ २. नामांकरामायण. (गीतिवृत्त.) राजीवोद्भव विनवी विश्वाहितदशमुखासि माराया; । मधुकैटभारि दशरथसुत होय, त्रिभुवनासि ताराया ॥ राम प्रभु कौसल्यासुत, कैकेयीकुमार तो भरत, । महितगुण सुमित्रात्मज लक्ष्मणशत्रुघ्न कीर्तिलोभरत ॥ राजासि राम लक्ष्मण गांधिज मागे, स्वयाग रक्षाया । ४५ ४६ १. हृदयांत अमृतकुपी असल्यामुळे पुन: पुन: उत्पन्न झालेले असे अनेक मस्तक. २. हंस या उत्तम पक्ष्याला ३. इंद्र. ४. सीता. ५. दशरथही. ६. कार्तिकस्वामीचा जो बाप महादेव त्याच्या मित्राचें म्ह० कुबेराचें. ७. शोभायमान सेतु आदिक सर्व ८. राक्षसविशेष. ९. शत्रुघ्न १०. ज्ञानीही. ११. अज्ञानीही. १२. भक्तरूप मोरांस भघासारखा. 'मयूर' शब्दांत कवीनें आपलें नांवही सूचित केलें आहे. १३. यांत पूर्वार्धाच्या आरंभी रा आणि उत्तरार्धाच्या म याप्रमाणे प्र- त्येक आयँत रामनाम आहे, म्हणून यास 'नामांकरामायण' म्ह० नामानें चिह्नित रामायण हैं नांव दिले आहे. १४. कमलापासून उत्पन्न झालेला ( ब्रह्मदवे.) १५. स्तुत्यगुण. १६. विश्वामित्र,