पान:रामायणे भाग पहिला.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोरोपंतकृत सत्वर मग निजपदभ मे करालयजल आणवुनि, स्वदासनंदिकरें, । शरणागतासि केला लंकाराज्याभिषेक बंधुकरें. ॥ ज नसुकृतफल दाखविलें भक्तकामसंतानें, । रेविसंतानेंद्रानें, रामानें, साधुवनवसंतानें ॥ पुसतां उपा य सागरतरणाचा, कैकैसीतनूज म्हणे; । 'निजपूर्वजकृत सागर विनवीं, देईल मार्ग वीरमणे !' ।। ९६ कैसें काय करा वें? चिंतित होता असें धरावर जें; । तें संकट हरिलेंसें केलें त्या पंक्तिकंधरावरजें ॥ सुगला दिसे म तें तो त्यक्ताहार स्वयें कुशास्तरणीं । तरणीकुलमणि बैसे, संकल्प करूनि सिंधुसंतरणीं ॥ तो निशिचर ज नपतिला सांगे जाऊनि दूत शार्दूल; । ‘कपिबल घेउनि आला सिंधुतीं राम भूपशार्दूल. ॥ काय शिलोच्च य आले सहाय रामासि सागर भराया ? | की जलधिशोषणक्षम घन ते झाले 'प्लवंगनिभ राया. ! ॥ १०० बल दशयो ज नपरिमित सिंधुतटीं उतरलें असे बहुत; । जाणों त्याच्या जठैरज्वलनीं होतील सर्वलोक हुत. ॥ १०१ झाला कपिना य क तो सहाय पूर्णाभिमानसह यातें; । गिरिशिखरतरुशिलायुध कपि नाचविती स्वैमानसहयातें ॥ १०२ ऐसें ऐकुनि रावण राघवसेनेंत भेद योजाया, । . शुकराक्षसासि सांगे, सुग्रीवाच्या समीप तो जाया. ॥ १०३ त्यास म्हणावें, 'म जशीं व्यर्थचि करिशी कशास कलहातें ? । जा मागें, नाहीं तर, मरतां कां माझिया सकल हातें ? १०४ स्वभुजबलें श्री हरिली देवांची, शत्रु जिंकिले सारे; । त्यांचा यत्न न चाले प्लवगा ! करिशील युद्ध कैसा? रे! ॥१०५ मी रामाची दारा हरिली, तरि काय हे तुझी हानी ? | हौं ! निर्बल दुर्मति हो! क्रॅव्यादें तर्पितां स्वदेहानी' ॥ १०६ ९९ १. समुद्रोदक. २. भक्तानंदकरें. ३. भक्तेच्छाकल्पवृक्षै. ४. सूर्यकुलश्रेष्ठे. ५. साधुवनास वसंतऋतूनें. ६. विभीषण. ७. आपले पूर्वज जे सगरपुत्र व भगीरथ यांणी केलेला. ८. रावणबंधु (विभीषण ) त्याणे. ९. दर्भासनीं. १०. राजश्रेठ ११. पर्वत १२ वानरतुल्य १३. जठरानीत. १४. दग्ध, भस्मीभूत १५. स्वमनोरूप घोड्यांतें १६. हाय. १७. मांसभक्षकें.