पान:रामायणनिरीक्षण.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामायणनिरीक्षण. राजा असून, बालकांडाच्या ७०-७१ व्या संगीत दिलेल्या यादीं प्रमाणें तो रामाहून ३० पिढ्यांनी प्राचीनतर आहे. या राजानें मरण समयीं असे उद्गार काढिले:-- O उत्पत्स्यते कुले ह्यस्मिन् इक्ष्वाकूणां महात्मनान् । रामो दाशरथिर्नाम यस्ते प्राणान् हरिष्यति ॥ ७-१९-२९ अनरण्याला पुढे होणाऱ्या रामाचे नांव ठाऊक असणे शक्य नाहीं, त्यानें एवढेच उद्गार साहजिकपणें काढिले असावेत :- "याच इक्ष्वा- कुकुलांत तुम्हां राक्षसांचा नायनाट करणारा पुरुष पुढें निपजेल ! " बालकांडाच्या ३९ सर्गोत सगरा ( रामाचा पूर्वज ) चा अश्वमे धाचा घोडा एकाएकीं नाहींसा झाला. तो घोडा कोणी पळवून नेला यासंबंधीं असें वर्णन आहे : - इंद्राने ' राक्षसी तनूचा ' आश्रय करून घोडा नेला. राक्षसी तनुमास्थाय यज्ञियाश्वमुपाहरत् ॥ ८ ॥ गतिं पुत्रा न पश्यामि रक्षसां पुरुषर्षभाः ॥ १२ ॥ यावरून सगराचा घोडा राक्षलांनीच पकडून नेला होता असें दिसतें. सगरपुत्रांनीं घोड्याचा शोध करण्याकरितां मार्गीत जे जे लोक सांपडतील त्या सर्वांना झोडपण्याचा सपाटा चालविला. अरण्यकांडाच्या ६५ व्या सर्गीत, वाल्मीकीचा आश्रम ज्या तमसा नदीच्या कांठीं होता, तेथें पूर्वी सौदास ( ऊर्फ कल्मा षपाद - हा रामाचा पूर्वज होता ) राजाच्या वेळी दोन राक्षस अस- ल्याविषयीं अशी हकीकत आहे: एकेवेळीं सौदास राजा मृगयेकरि- तां तमसा नदीच्या कांठीं गेला असतां, तेथील अरण्यांत मृगेंच नस- ल्याचें त्याचे दृष्टोत्पत्तीस आले. त्याचें कारण शोधून पाहतां त्यास त्या वनांत दोन राक्षस राहत असून, त्यांनीं तेथील मृगांचा फन्ना,