पान:रामायणनिरीक्षण.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ७ वें. उडविलेला आहे, असें कळून आलें. सौदासाने एका राक्षसास मारून टाकिलें; दुसऱ्याच्या मनांत सौदासावर केव्हां तरी एकदां सूड उग- बावा, असें आलें. सौदास राजा पुढे तमसेच्या कांठीं यज्ञ करीत असतां, हा राक्षस ( रक्षसा ब्रह्मरूपिणा ) ब्राह्मणाचं रूप घेऊन येऊन त्याच्या पाकशाळेवर राहिला. यज्ञानंतर वसिष्ठानें मांसाहार मागतांच या ब्राह्मणरूपी राक्षसानें राजापुढें नरमांस आणून ठेविलें. वसिष्ठानें राजानेंच आपणांस नरमांस दिलें असें समजून, त्यास तूं बारावर्षीपर्यंत राक्षसवत् राहशील, असा शाप दिला सौदासास मदयंती नामक पत्नी होती, उत्तरकांडाच्या ६७ व्या सर्गात लवणाचें वर्णन करित असतां त्यानें युवनाश्वपुत्र मांधातृ यास ठार केल्याविषयीं वर्णन आहे. मांधाता हा रामापूर्वीचा एक अयोध्येचा राजा असून त्यानें लवणा- कडे दूत पाठविला असतां, त्या दूतासच लवणानें खाऊन टाकिलें; व पुढें मांधात्यालाही मारून टाकिलें. ( वदंतमेवं तं दूतं भक्षयामास राक्षसः ॥ ७. ६७, १८ ॥ ) हा लवण रामाच्या काळचा असून रामाचा पूर्वज जो मांधाता त्याशीं कसें लढला, अशी कोणाची तरी शंका येण्याचा संभव आहे; पण आमचें उत्तर ठरलेलेच आहे. लवणानें नाहीं, लवणाच्या कोणीं तरी यमुनेच्या कांठावरच्या पूर्वजानें तरी मांधात्यास ठार केले असेल. याच लवणाविषयीं वाल्मीकि · शत्रुघ्नास ह्मणत आहे:- बहवः पार्थिवाः सौम्य ! हताः सबलवाहनाः । लवणेन महाबाहो युद्धमाना महाबलाः ॥ ७.७१.७ याप्रमाणे रामापूर्वी अनेक पिढ्यांपर्यंत जरी राक्षस आर्यांना त्रास देत होते, तरी आर्यहि केव्हां केव्हां त्यांत विजयी होत असत.