पान:रामायणनिरीक्षण.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

C मकरण ७ वे. PE .

तान् भक्षयित्वा तंत्रस्थान महर्षीन् यज्ञमागतान् । वितृप्तो रुधिरैस्तेषां पुनकोसंप्रययौ महीम् ॥ १९ ॥ एकोणिसाव्या सर्गात आभीरव नामक राजांनीं ' निर्जिताः स्म ' असे म्हणून रावणास शरण गेलेला उल्लेख आहे. येथें टीकाकार म्हणतो की आभीरवः हें राजांचें नांव नसून तें' भित्रे ' या अर्थाचें राजाचें विशेषण घ्यावें; पण आम्हांस तसे वाटत नाहीं. मूळांत असे आहे:- ततस्त्वाभीरवः प्राज्ञाः पार्थिवा धर्मनिश्चयाः । मंत्रयित्वा ततोऽन्योन्यं राजानः सुमहाबलाः ॥ निर्जिताः स्मेत्यभाषंत ज्ञात्वा वरबलं रिपोः ॥ ४ ॥ तसेंच दुष्यंत, सुरथ, गाधि, गय, पुरूरवस् वगैरे आर्य राजांसही रावणानें जिंकून टाकल्याविषयीं उलेख आहे:- - दुष्यंतः सुरथः गाधिः गयो राजा पुरूरवाः । - एते सर्वेऽब्रुवंस्तस्य निर्जिताः स्मेति पार्थिवाः ॥ ७-१९-५ ॥ एथें टीकाकारानें असें म्हटले आहे:- “ भिन्नभिन्नकालवर्तिनोऽपि दुष्यंतादयः स्वस्वकाले रावणं प्रति जितत्ववादं वरदानात् उक्त- वंतः । " टीकाकारानें म्हटल्याप्रमाणे एकच रावणानें रामापूर्वी १०००-५०० वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या पुरूरवसू, मरुत्त, दुष्यंत वगैरे आर्यराजांस जिंकलें असें मानण्यापेक्षां, वर आम्ही म्हटल्या- प्रमाणें रामापूर्वी अनेक शतकेंपर्यंत आर्यराजांस सालंकटंकटा वंशांतील राक्षसांचा हिंदुस्थानांत अगदी उत्तरेपर्यंत त्रास होत असे, हेंच मानणें ऐतिहासिक दृष्ट्या जरूर व योग्य दिसतें. याच सर्गात रावणानें अयोध्येत जाऊन तेथील अनरण्य नामक राजास ठार केल्याचा उल्लेख आहे. अनरण्य हा इक्ष्वाकुकुलांतील