पान:रामायणनिरीक्षण.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामायणनिराक्षण. केचित्तेजस्विनः शूराः क्षत्रिया युद्धदुर्मदाः । तच्छासनं अकुर्वतः विनेशुः सपरिच्छदाः ॥ ४८ ॥ अपरे दुर्जयं रक्षः जानंतो प्राज्ञसंमताः । जिताः स्म इत्यभाषेत राक्षसं बलदर्पितम् ॥ ४९ ॥ उत्तरकांड, सर्ग १६ वा. जे क्षत्रिय रावणास मान वांकवीत नसत, त्यांचा रावण समूळ उ- च्छेद करून टाकी; यामुळे इतरांस धाक बसून ते त्यास शरण जात. ८८ उत्तरकांडांतील १७ व्या सगत कृतयुगांतील वेदवती पुनः द्वा- परयुगांत सीता होऊन जन्मली असे म्हटले आहे; पण रावणानें वेदवतीस त्रास दिल्यामुळे ती पुढें सीता होऊन त्याच्या नाशास्तव पुनः उत्पन्न झाली, असे जें कवीने म्हटले आहे, त्या योगें रावण कृतयुगापासून द्वापरापर्यंत जगला होता, असें धरावें लागतें | व अशा समजुतीनेंच पुढे अनेक रामापूर्वीच्या राजांस स्वतः रावणानें ठार केलें, असें उत्तरकांडांत वर्णन आढळतें. या कालविपर्यासामुळे सर्व हकीकतच त्याज्य न मानितां, रावण हा राक्षस रामाचा समका-- लीनच समजून, रामापूर्वीच्या ज्या राजांना प्रत्यक्ष रावणानें जिंकलें असें वर्णन आहे, त्या राजांशीं ( स्वतः रावणानें नसले तरी ) रावण ज्या सालंकटकटा वंशांतील राक्षस होता, त्या वंशांतील इतर पूर्वीच्या राक्षसांनी लढाया केल्या, असे मानण्यास आम्हांस तरी कांहीं प्रत्य- वाय दिसत नाहीं. आठराव्या सर्गात, मरुत्तराजा यज्ञ करीत असतां रावणानें जाऊन त्यास 'जितोऽस्मि असें म्हण; नाहीं तर तुझा नाश करून टाकितो' असे सांगून, त्यास जेव्हां मरुत्तानें दाद दिली नाहीं, तेव्हां यज्ञांतील ऋषींना खाऊन टाकून यज्ञ मोडून आलेला उल्लेख आहे. D