पान:रामायणनिरीक्षण.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामायणनिरीक्षण, याप्रकारें आर्य ऋषींशी संबंध घडवून आणण्यांत या राक्षसांस भूषण वाटत होतें असें दिसतें. पुढे यांच्या पोटीं रावण, कुंभकर्ण, बिभीषण व शूर्पनखा अशीं मुले झाली. याप्रमाणे आर्यांचे व राक्षसांचे शरीरसंबंध जडून सालकटंकटा वंशांतील राक्षस पौलस्त्य झाले ! तसेंच यक्षांचा राजाहि वैश्रवण झाला ! असो. पुढें क्रमाक्रमानें राक्षसांनीं पुन: इकडे बस्तान बसवून व लंकेंत कुबेराशीं तंटा काढून, त्यास तेथून हुसकून लाविलें. तेव्हां यक्षाधि- पति कुबेर हा आपल्या मंडळीसह उत्तरेस हिमालयांत मंदाकिनीच्या काठी अलका नामक नगरी स्थापून तेथें राहूं लागला. उत्तरेस जरी कुबेर राहूं लागला, तरी रावणानें त्याची पाठ सोडिली नाहीं.. अलका नगरीस जाऊन त्यानें तिला वेढा दिला; पुढें युद्धांत यक्षांचा बराच फन्ना उडवून कुबेराचें पुष्पक विमान रावणानें हरण केलें. रावण व लंकेतील राक्षस क्रमाक्रमानें इतके बलाढ्य झाले की हिंदुस्था- नांतलि बहुतेक जातींच्या लोकांचें व विशेषेकरून आयचे त्यांना मुळींच भय वाटेनासे झालें; आर्थीस तर तो कस्पटाप्रमाणे मानीत असे. सुर्पणनागयक्षाणां दैत्यदानवरक्षसाम् । अवध्योऽहं प्रजाध्यक्ष देवतानां च शाश्वत ॥ १९ ॥ न हि चिंता ममान्येषु प्राणिष्वमरपूजित । तृणभूताहि ते मन्ये प्राणिनो मानुषादयः ॥ २०॥ सर्ग २० वा. सुपर्ण ( याच जातीचे जटायु व संपाति हे होत ) नाग, यक्ष, दैत्य ऊर्फ [ असुर ], दानव, इतर राक्षस, देव, [ आर्यांचे पूर्वज ] इत्यादींस रावण भीतच नसे; मानुषांस ( हिंदुस्थानांतील आयस ) तो कस्पटाप्रमाणें लेखीत असे. रावण इकडे प्रबल झालेला पाहून सुमाली पुनः इकडे येऊन त्यास ह्मणतो:- --