पान:रामायणनिरीक्षण.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ७ वें. ८५ विश्रव्यानें सांगितल्याप्रमाणे यक्षांना बरोबर घेऊन कुबेर लंकेंत राहू लागला. यावरून आर्यांनी लंका जिंकून कृपेने ती यक्षांस देऊन टाकिली अर्से वाटतें. याप्रमाणें, लंकेंत यक्षांचा राजा कुबेर हा राहत असतां तो आईबापांस भेटण्यासठी विमानांतून हिमालयाकडे जात असे:- काले काले तु धर्मात्मा पुष्पकेण धनेश्वरः । अभ्यागच्छत् विनीतात्मा पितरं मातरं च हि ॥७. ३. ३४॥ याप्रकारें यक्षांचा लंकेंत उत्कर्ष चाललेला असतां रसातळास पळून गेलेला सुमाली राक्षस आपल्या गणांनिशीं पुनः इकडे आपली कांहीं डाळ शिजते की काय, हें पहाण्यासाठी आला:- कस्याचित्त्वथ कालस्य सुमाली नाम राक्षसः | रसातलान्मर्त्यलोकं सर्वे वै विचचार ह || तदाsपश्यत् स गच्छंतं पुप्पकेण धनेश्वरम् । गच्छंतं पितरं द्रष्टुं पुलस्त्यतनयं विभुम् ॥७-९१-४॥ विश्रव्यामुनीला आपली तेव्हां सुमालीच्या मनांत आलें कीं कैकसी नामक मुलगी द्यावी, व या प्रकारें लंकेंत पुनः अर्धा हिस्सा स्थापन करावा. कैकसी ही राक्षसी होती. तिला सुमाली ह्मणतो:- - सा त्वं मुनिवरं श्रेष्ठं प्रजापतिकुलोद्भवम् । भज विश्रवसं पुत्रि पौलस्त्यं वरय स्वयम् ।। ईदृशास्ते भविष्यंति पुत्रा: पुत्रि न संशयः । तेजसा भास्करसमा यादृशोऽयं धनेश्वरः ॥ ७९१ १३॥ विश्रव्याकडे जाऊन कैकसी राक्षसी त्यास ह्मणतेः- किंतु मां विद्धि ब्रह्मर्षे शासनात् पितुरागताम् । कैकसी नाम नाम्नाहं शेषं त्वं ज्ञातुमर्हसि ||