पान:रामायणनिरीक्षण.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८४ रामायणनिरीक्षण.

  • मागें सांगितल्याप्रमाणें विष्णूच्या भयानें राक्षस लका सोडून

गेल्यानंतर आसपास समुद्रकांठीं (मलबारच्या) राहिलेल्या यक्षांच्या राजानें-कुबेरानें-लंका नगरी व्यापिली व तेथें आपली वसाहत केली ( पुत्रैश्च पौत्रैश्च समन्वितो बली ततस्तु लंकां अवसद्धनेश्वरः ॥ ७-८- २९ ॥ ) या कुबेराजवळ पुष्पक नामक विमान होतें; त्यायोगें तो हिंदुस्थानांत चोहोकडे प्रवास करीत असे. कुबेराची उत्पत्ति. पुलस्त्य हा ब्रम्हर्षि तृणबिंदूऋषींच्या आश्रमाजवळ (हिमालयांत) राहिलेला होता. हा आर्यऋषी होता; पण याच्या आश्रमाजवळ जाऊन अनेक जातींच्या मुली त्यास त्रास देतः— - गत्वाश्रमपदं तस्य विघ्नं कुर्वेति कन्यकाः । ऋषिपन्नगकन्याश्च राजर्षितनयास्तथा । क्रीडत्योऽप्सरसश्चैव तं देशं उपपेदिरे ॥ ७२९॥ शेवटीं पुलस्त्यास तृणबिंदूच्या कन्येच्या ठाई विश्रवा नामक पुत्र झाला. या विश्रव्यानें भारद्वाजाच्या कन्येशीं लग्न केले. या काळीं आर्यलोक इतराजातींच्या कन्यांशी लग्नें किंवा संबंध करू लागले होते अर्से चाटते; कारण, विश्रव्याच्या पोटीं कुबेर हा यक्ष झालेला आहे, यावरून विश्रव्यानें एकाद्या यक्षीशी संबंध केलेला असावा. विश्रव्यानें या आपल्या यक्षीपुत्राला ( कुबेराला ) --राक्षसांनी सोडून गेल्यामुळे ओसाड झालेल्या लंकेत जाऊन राहण्यास सांगितलें:- राक्षसैः सा परित्यक्ता पुरा विष्णुभयादितैः ॥ शून्या रक्षोगणैः सर्वैः रसातलतलं गतः ॥ शून्या संप्रति लंका सा प्रभुस्तस्या न विद्यते॥७-३-३०॥