पान:रामायणनिरीक्षण.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ७ के.व, ८३ वरील ऋचेंतील 'ब्रह्मद्विषे,' 'क्रव्यादे' व 'घोरचक्षसे हीं तीन विशेषणे अत्यंत महत्वाची आहेत. त्या विशेषणांवरून वैदिक राक्षसही रामा- यणकालीन राक्षसांप्रमाणेच ब्राह्मणांचा द्वेष करणारे, ( बहुधा त्यांस मारून त्यांचें ) मांस खाणारे व उग्रस्वरूपी होते, हे कळून येईल. ★ अशा राक्षसांविषयीं ऋग्वेदीय ऋषीनीं देवाजवळ कशी प्रार्थना केली आहे हें वाचकांस कळलेंच आहे. ऋग्वेदांतील राक्षसांविषयींचे उद्गार मासल्याकरितां थोडेसे पा- हिल्यानंतर यजुर्वेदांतील अगदीं महत्त्वाचा एक उद्गार आपण पाहूं तो असाः - नार्यासीदमहं रक्षसां ग्रीवा अपि कृन्तामि ॥ ५. २१ ।। यांत कोणी एक मनुष्य ' मी राक्षसांचे गळेच कापून टाकतों असे एका स्त्रियेस ह्मणत आहे. यजुर्वेदांत रक्षोहन् ( राक्षसांस मारणारा ) हें विशेषण अनेकवेळां विष्णूस लाविलें आहे. याज्ञ- वल्क्यशिक्षेत विद्या केव्हां येते हें सांगत असतां याज्ञवल्क्य शिक्षेत ह्मणतात की:- अहेरिव गुणागीतः संमानान्नरकादिव । राक्षसीभ्य इव स्त्रीभ्यः स विद्यामभिगच्छति ॥ ६८ ॥ यांत स्त्रियांस राक्षसींना जसें भ्यावें तसें भ्यावें, ह्मणजे पूर्ण ब्रह्मचर्य राखावें, असा भाव आहे. असो. प्राचीन संस्कृत वाङ्मयांत विशेषेकरून स्मृती व सूत्रग्रंथांत अनेक ठांई राक्षसांच्या व त्यांच्या आहार व आचार यांचा निषेधपूर्वक उल्लेख आलेला सर्वच उल्लेख येथें देणें अवश्यक आहे असें नाहीं. त्यांतील महत्त्वाचे उल्लेख योग्यस्थळीं दिलेले आहेत. असो. आहे.