पान:रामायणनिरीक्षण.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामायणनिरीक्षण. ( रामापूर्वीच्या आयशीं ) राक्षसांच्या झटापटी. कळून --- रामापूर्वी राक्षसानीं हिंदुस्थानांत थेट उत्तरेकडलि यमुनानदीपर्यंत अनेक प्रकारचा कल्लोळ उडवून दिला होता, हें वेदांतील मंत्रांवरून व रामायणांतील व इतर पुराणांतील अनेक वर्णनांवरून येईल. राक्षसांविषयीं ऋग्वेदांतील ऋषींचे उद्गार आपण पाहूं:--

  • अग्ने त्वचं यातुधानस्य भिद्धि, हिंस्त्राशनिर्हरसा हंत्वेनम् ।

म पर्वाणि जातवेदः शृणीहि,क्रव्यात्क्रविष्णुर्विचिनोति वृक्णम् ॥ [ ऋग्वेद १०-८७–५] इंद्रासोमा तपतं रक्ष उब्जतं न्यर्पयतं वृषणा तमोवृधः । परा शृणीतमचितो न्योषतं हतं नुदेशां नि शिशीतमत्रिणः || इंद्रासोमा समघशंसमभ्यघं तपुर्ययस्तु चरूरग्निवाँ इव | ब्रह्मद्विषे, कायदे, घोरेचक्षसे द्वेषो धत्तमनवार्य किमीदिने ॥ ऋग्वेद ७-१०४- १व २ ८२

  • हे अग्ने तूं यातुधानांची ( राक्षसांची ) त्वचा विदारण कर; नंतर तुझे संहार

करणारें वज्र त्याला ताप देऊन त्याचे हनन करो. मग त्या वध केलेल्या राक्षसांचें शरीरच सांध्यांच्या ठाई तोडून त्याची पेरें कर; व त्या तुकडे तुकडें झालेल्या राक्ष साला मांसाची इच्छा करणारे लांडग्यासारखे प्राणी खाऊन टाकोत ! अहो इंद्रसोमांनो ! राक्षसांनां ताप देऊन त्यांचा नाश करा. इच्छिलेले देणाऱ्या देवांनो ! त्या अज्ञानपूर्ण राक्षसांनां खाली फेकून त्यांस पळवून लावा. त्यानां दग्ध- करा, मारा, आणि त्या खादाडांचा अगदीं नायनाट करून टाका. अहो इंद्रसोमांनों ! या दृष्ट राक्षसांवर दोघेही उठा. तो तुमच्या तेजानें तप्त होऊन अग्नीत टाकिलेल्या आहुतीप्रमाणे जळून खाक होवो. तो ब्राम्हणांचा द्वेष करणारा, मांस खाणारा व उम्र स्वरुपी राक्षस सर्वकाळ निरवयव राहील अर्से करा. ( त्याचा समूळ नाश करा. ) राक्षसांसच यातुधान अर्से रामायणांतही अनेक ठाई म्हटले आहे.