पान:रामायणनिरीक्षण.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

डील जातींस व विशेषतः असे आहे :- - प्रकरण ७ वें. ८१ आर्यऋषींस त्रास देऊं लागले. त्याचें वर्णन शरणान्यशरणानि आश्रमाणि कृतानि नः ॥ ६.५ ॥ स्थानान्यपहृतानि नः ॥ लंकायां स्थिता राक्षसाः प्रवाधते ॥ "तेव्हां, नेहमींच्या पद्धतीप्रमाणें ही तक्रार विष्णूच्या कानांवर गेल्या बरोबर विष्णु युद्धास तयार झाला व त्यानें राक्षसांचा पाडाव करून त्यांस लंकेतून हाकून लाविलें:- - अशक्नुवंस्ते विष्णुं प्रतियोद्धुं बलार्दिताः । त्यक्त्वा लंकां गताः सर्वे पातालं सहपत्नयः ॥ २२ ॥ सुमालिनं समासाद्य राक्षसं रघुसत्तम । स्थिताः प्रख्यातवीर्यास्ते वंशे सालंकटंकटे ॥ २३ ॥ चिरात्सुमाली व्यचरद् रसातलं । स राक्षसो विष्णुभयादितस्तदा ॥२९॥ ते जेथून आले होते तेथेंच ह्म० पातालास उर्फ रसातलास ते निघून गेले. माली, सुमाली वगैरेच्या वेळेस राक्षस हिंदुस्थानांत आलें; त्यांपूर्वी ते पाताळांत होते; तेथलाच हा सालंकटंकटा नामक राक्षसांचा वंश होय ! असो, या सर्व विवेचनांतील सार एवढेंच कीं रामापूर्वी कित्येक पिढ्यांपर्यंत केंत व तेथून हिंदुस्थानांत पाताळांतील सालंकटंकटा वंशांतील राक्षसांनीं वसाहत केली होती. या राक्षसांच्या व वैदिक आर्य ऋषींच्या वारंवार झटापटी होत. केव्हां केव्हां या राक्षसांना आपलें इकडचें स्थान सोडून देऊन स्वदेशास पळून जावें लागे. असो. ६