पान:रामायणनिरीक्षण.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामायणनिरीक्षण. यक्षाम इति यैरुक्तं यक्षा एव भवतु वः ॥ १३ ॥ वरील श्लोकांतील रक्षस् व यक्ष यांची व्युत्पत्ति काल्पनिक आहे. ती सोडून दिली तर एवढे तरी कळून यतें कीं यक्ष व राक्षस मूळचे समुद्रकांठीं राहणारे आयस आढळले. राक्षस लंकेत राहिले होते, व यक्ष त्यापूर्वी मलबारच्या किनाऱ्यावर राहिलेले असतील. कारण यक्ष व राक्षस या दोन्हीं जातींना रामायणांत ' नैऋताः ' असेंच झटलें आहे. ८० १ हेत I २ विद्युतकेशाची बायको (सालंकटंकटा ) J ३ सुकेश ४ माल्यवान् - माली - सुमाली कैकसी ५ हेति व प्रति हे दोघे राक्षस बंधु होते, हेति यास विद्युत्केश हा पुत्र झाला. त्यानें सालंकटंकटा राक्षसीशी लग्न केलें, पुढे त्यास सुकेश नामक पुत्र झाला. सुकेशाचे लग्न ग्रामणी नामक गंधर्वाच्या देववती नामक कन्येशीं झालें. त्यास माल्यवान् - माली - व सुमाली नामक मुले झालीं. कैकसीस पुढें रावण कुंभकर्ण - बिभीषण, शुर्पणखा वगैरे मुलें झालीं; इत्यादि हकीकत रामायणांत आढळते. माली, सुमाली, माल्यवान् इत्यादि सालंकटंकटा वंशांतील राक्षस हिंदुस्थानाजवळी- लच लंका बेटांत येऊन राहिले. ( कोठून आले हे पुढे कळेलच ). हे राक्षस सर्व जातींस त्रास देत असत ( संतापर्यतः त्रीन् लोकान् सदेवासुरमानुषान् । ) ते सुर, नाग, ऋषि, यक्ष, गंधर्व वगैरे इक