पान:रामायणनिरीक्षण.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ७ वें. ( ५ ) उपशांतिप्रकरणं ततः पंचसहस्रकम् । पंचमं पावनं प्रोक्तं युक्तिसंततिसुंदरम् ॥ ३१ ॥ ( ६ ) निर्वाणाख्यं प्रकरणं ततः षष्ठमुदाहृतम् । शिष्टो ग्रंथः परीमाणं तस्य ज्ञानमहार्थदः ॥ ४० ॥ पुस्तकांतील लोकसंख्या व सध्यां उपलब्ध असलेली लोकसंख्या यावरून पाहिलें असतांही वाल्मीकीनें जसा व जितका हा ग्रंथ लिहि ला, तसा व तितका तो आज राहिलेला नाहीं हें कळून येईल, असो.. -१०:--- प्रकरण. ७ वें. राक्षस व त्यांचें मूळनिवासस्थान. ७७ पूर्वी भरतखंडांत नानाप्रकारच्या मनुष्यांच्या जाति असत. पौरा- णिक भाषेत यांनां ‘ योनि' असें ह्मटले असून अमरकोशांत यांसच देवयोनि ' ह्मटलें आहे. ' देवांच्या योनीप्रमाणें ह्म. उत्पत्तीप्रमाणे ज्यांची उत्पत्ति कळत नाही ते देवयोनि' होत, असे याचें एका टीकाकारानें स्पष्टीकरण केलेले आहे. अलीकडे जरी राक्षस, यक्ष, देव दैत्य वगैरे ‘ काल्पनिक भयंकर पुरुष ' आपणांस वाटत असले, तरी पूर्वकाळीं त्यांकडे वेगळाल्या मनुष्यजाति याच दृष्टीनें इकडील लोक अवलोकन करीत असत. अशाच दृष्टीनें भरतखंडांतील ' द्वादश- योनि व त्यांचीं कर्तव्यें ' यांचेविषयीं वामनपुराणांत (अ. ११ ) ,