पान:रामायणनिरीक्षण.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मकरण ६ वें. ७५ दोन्ही ग्रंथ आर्षच असून साध्या, मनोहर व गोड भाषेत लिहिलेले आहेत; यावरून आह्मांस तर योगवासिष्ठ हा ग्रंथ वाल्मीकिऋषींचाच असावा, असे वाटतें. कर्ता-वाल्मीकि नांव - रामायण सप्तकांडात्मक रामायण. कथोपाय योगवासिष्ठ ऊर्फ वासिष्ठरामायण. मोक्षोपाय रामाचा आधिभौ २४,००० तिक इतिहास

रामाचा ३२,००० आध्यात्मिक इतिहास ५६,००० वरील कोष्टकावरून वाल्मीकिरामायणाचा व योगवासिष्ठाचा संबंध नीटपणें कळून येईल. याप्रमाणें, जरी योगवासिष्ठ ( मूळचें ) वाल्मीकीनेंच लिहिलेले असावें, तथापि वाल्मीकीनें लिहिल्याप्रमाणेंच सध्या ते मिळतें. कीं नाहीं याबद्दल मात्र शंका आहे. वाल्मीकि हा जर रामाचा समकालीन होता ही परंपरा ऐतिहासिक दृष्ट्या जर खरी आहे, तर योगवासिष्ठांत पांडवकालीन कृष्णद्वैपायन व्यास व त्याचा भारत- ग्रंथ - यांचा कां उल्लेख यावा हे मला समजत नाहीं. ते उल्लेख असे:- - पय: पीनघनश्यामं व्यासमेव किलांतरा || ताराजाल इवांभोदो व्यासो यत्र विराजते || ( यो. वा. १.३३.)

अद्याप्यन्ये भविष्यंति व्यासवाल्मीकयस्तथा ॥ क्रमेणास्य मुनेरित्थं व्यासस्याद्भुतकर्मणः ।