पान:रामायणनिरीक्षण.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामायणनिरीक्षण. श्रीब्रह्मोवाच || गुरुं वाल्मीकिमत्राशु प्रार्थयस्व प्रयत्नतः । तेनेदं यत्समारब्धं रामायणमनिंदितम् ॥ ९ ॥ तस्मिच्छ्रुते नरो मोहान् समग्रान् संतरिप्यति । सेतुमेवांबुधे: पारं अपारगुणशालिना ॥ १० ॥ नंतर ब्रह्मदेव त्या भरद्वाजाबरोबर श्रीवाल्मीकि ऋषीकडे येऊन त्यास ह्मणाले:- ७४ रामस्वभावकथनादस्माद्वरमुने त्वया । नोद्वेगात्स परित्याज्य आसमाप्तेरनिंदितात् ॥ १३ ॥ असें म्हणून ब्रह्मदेव निघून गेले. नंतर बाल्मीकीस आश्चर्य वाटून पुनः त्यानें भरद्वाजास विचारिलें कीं तुला ब्रह्मदेवांनीं काय सांगितलें ? तेव्हां भरद्वाज ह्मणालाः - एतदुक्तं भगवता यथा रामायणं कुरु । सर्वलोकहिताथीय संसारार्णवतारकम् ॥ १९ ॥ या सर्व वर्णनांवरून, वाल्मीकीनें प्रथम सप्तकांडात्मक रामायण ( कथोपाय असे वरील श्लोकांत ह्मटलेलें आहे ) रचून, नंतर ( त्या ग्रंथाच्या योगें जरी इतिहास वगैरे कळला तरी लोकांस मोक्ष प्राप्त होत नाहीं असें जाणून) त्यानें रामायणाचाच पुढील भागरूपी प्रस्तुत ग्रंथ ( यासच मोक्षोपाय असें वर झटलें आहे ) रचिला असें कळून येईल. या दोन्हीं ग्रंथांस वाल्मीकिऋषीनें रामाय- णच ह्मटलें आहे; व तें यथार्थ आहे असे आह्मांस तरी वाटतें; कारण, सप्तकांडात्मक रामायणांत वाल्मीकीनें रामाचा आधिभौतिक इतिहास लिहिला आहे; व या रामायणांत त्यानें रामाच्या स्वभा- वा' चा ऊर्फ आध्यात्मिक उन्नतीचा इतिहास लिहिला आहे. 6