पान:रामायणनिरीक्षण.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७२ रामायणनिरीक्षण. 66 मोहपटलानें युक्त झालेल्या रामास वसिष्ठानें आत्मयोग सांगितला आहे. योगवासिष्ठ हा ग्रंथ अध्यात्मशास्त्रावर अप्रतिम आहे; यांत रामाच्या आध्यामिक उन्नतीचा व उत्क्रांतीचा इतिहास आहे. प्रत्येक प्रकरणां- • तील सर्गाच्या शेवटीं " इत्या वासिष्ठ महारामायणे वाल्मीकीये मोक्षो- पाये द्वात्रिंशत्साहस्रयां संहितायां प्रकरणे.... सर्गः" असा उल्लेख असतो. यावरून हा ग्रंथ ३२०००चा असून, यास मोक्षोपाय ऊर्फ वासि- ष्ठुरामायण असेंहि ह्मणत असत असे कळून येईल. येथें या ग्रंथास ‘वाल्मीकीय’ असेंच ह्मटलें आहे; पण, प्रत्यक्ष ग्रंथांतच याच्या कर्तृत्वा- विषय काय माहिती मिळते, ती आपण पाहूं. ग्रंथांत कथाप्रारंभ असा केला आहे: – सुतीक्ष्ण नामक कोणी एक संशयानें ग्रस्त झालेला ब्राह्मण अगस्ति ऋषीच्या आश्रमास जाऊन त्यास मोक्षाविषयीं कांहीं प्रश्न करितो; तेव्हां त्याविषयीं उत्तर देते- वेळीं अगस्तिऋषि अग्निवेश्याचा पुत्र कारुण्य याची कथा सांगतो. कारुण्य नांवाच्या आपल्या अकर्मरत पुत्राची समजूत घालतेवेळीं अग्नि.. वश्य त्यास सुरुचेि व देवदूत यांची गोष्ट सांगतो. हा देवदूत सुरुची - स अरिष्टनेमी राजा राज्य सोडून मोक्ष मार्गास लागलेली हकीकत सांग- तो. इंद्रानें त्या देवदूतास अरिष्टनेमी राजास वाल्मीकिऋषीकडे मोक्षाचा बोध करण्यासाठी घेऊन जाण्यास सांगितले आहे. ! नंतर १ दूत गच्छ पुनस्तत्र तं राजानं नयाश्रमम् ॥ ४४ ॥ वाल्मीकेशतितत्वस्य स्ववोधार्थ विरागिणम् || संदेशं मम वाल्मीके महत्व निवेदय ॥ ४५ ॥ महर्षे त्वं विनीताय राज्ञेऽर मैं वीतरागिणे ॥ न स्वर्गमिते तत्त्वं प्रवोधय महामुने ॥ ४६ ॥ योगवासिष्ट, प्रकरण १ लें, सर्ग १ ला.