पान:रामायणनिरीक्षण.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ६ वें. अनागतं च यत्किंचिद्रामस्य वसुधातले । तच्चकारोत्तरे काव्ये वाल्मीकिर्भगवानृषिः ॥ ४०॥ ७१ असा श्लोक आहे. यावरून त्यानंतर व्हावयाचें असलेलें रामचरित्र त्यांनी उत्तरकाव्यांत ह्मणजे उत्तरकांडांत ग्रथित केल्याचें लिहिलें आहे; तरी, तो महर्षीचा उद्देश आहे. कारण पुढे होणाऱ्या गोष्टी त्यांना कळल्याच नव्हत्या. मग त्या ग्रथित कशा करणार? ब्रह्मदेवांचा वरहि रामाचें झालेलें चरित्र कळेल एवढाच होता. पुढील चरित्राचा संबंध सीतात्यागाशीं विशेष असल्यामुळे सीतात्यागही त्याबरोबर उत्तरकांडांत येणें युक्तच आहे. युद्धकांड आणि उत्तरकांड यांमध्यें इतर कांडांपेक्षा अधिक कालांतर गेलें होतें, ही गोष्ट मात्र निर्वि- वाद आहे. "

केसरी ( १ - १० - १९१२ ), हें रा. पाटणकर यांचें विवेचन वर आमचे विचारसरणींत येऊन गेलेलेंच आहे. वाचकांच्या मनांत केवळ आमच्या विचारांचें दृढीकरण होण्यासाठींच हा उतारा मुद्दाम आम्हीं येथें उतरून घेतला आहे -10:--- वाल्मीकि व योगवासिष्ठ, १२९१ ६७ञ वाल्मीकिऋषीनें सप्तकांडात्मक रामायणाशिवाय आणखी एक ग्रंथ लिहिला आहे, अशी पूर्वपरंपरा आहे. ही परंपरा कितपत खरी आहे, हे आपण योगवासिष्ठाच्या प्रारंभींच्या भागावरून पाहूं. योगवासिष्ठ असे या ग्रंथास नांव पडण्याचें कारण हेंच की, यांत