पान:रामायणनिरीक्षण.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामायणनिरीक्षण. काय आहे यासाठीं त्याची अवज्ञा करूं नका. " याचा अर्थ असा कीं,, राजा हा सामान्य मनुष्यासारखा वाटला तरी धर्मतः सर्वोचा अर्थात् तुमचाहि-पिता आहे. वस्तुतः रामचंद्राचे ते पुत्र असतां एवढा द्राविडी प्राणायाम करून त्यांना हें नातें पटविण्याचें प्रयोजन होतें ? यावरून त्या राजपुत्रांना त्यांचें रामाशीं असले नातें कळणार नाहीं, इतकाच रामायणांतील भाग अर्थात् युद्धकां- डापर्यंतचा भाग - -महषींनीं शिकविला होता व तोच अश्वमेधाचे वेळी त्यांनी गाऊन दाखविला ही गोष्ट सिद्ध होते. उत्तरकांडांतील सीतात्यागापर्यंतची कथा या वेळीं लिहिली जाण्यास हरकत नव्हती, परंतु ते लिहिली असती तर वरील संबंध राजपुत्रांना कळला असता. शिवाय, सीतेचें पावित्र्य लोकांस पटविणें हा जो महषींचा उद्देश तो सिद्धीस जाण्यास हें वर्णन लोकांपुढें येणें इष्टच नव्हते व त्याप्रमाणें तें आलेले दिसत नाहीं. कारण, रामायणाचें गायन सुरू झाल्यावर जो आनंद लोकांना झाला तो तें पूर्ण झाल्यावरहि कायम होता. हा आनंद सीतात्यागाची कथा ऐकून कायम राहिला नसता. अर्थात् रामाच्या दरबारांत झालेलें गायन राज्याभिषेकापर्यंतच असले पाहिजे. कदाचित् " तो रामचंद्र सांप्रत गादीवर असून त्यानें प्रजानुरंजना- करितां आपल्या पत्नीचाहि त्याग केला आहे " एवढी साधी गोष्ट महमानीं राजपुत्रांना सांगितली असेल. उत्तरकांडांतील कथा रामाच्या महाप्रस्थानानंतर लिहून महषींनीं रामायण समाप्त केलें असावें. पुढील कथा उत्तरकांडांत गोवण्याचा महषींचा उद्देश रामायणाच्या प्रारंभीच दिला आहे. युद्धकांडाच्या शेवटीं रामायण समाप्त करून उत्तरकांड नंतर लिहिलें; प्रारंभी ते लिहिण्याचा उद्देश नव्हता, असे प्रो. परांजपे ह्मणतात तसें नाहीं. बालकांडाच्या तिसऱ्या सर्गात रामा- यणांतील ठळक कथांची यादी दिली आहे त्याच्या शेवटीं-