पान:रामायणनिरीक्षण.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ६ वें. रामायण गाणारे गवई आपले भावी अधिपति आहेत ही जाणीव त्या -मंडळीला नव्हती व ही पाहुणे मंडळी आपले सेवक आहेत असे त्या · राजपुत्रांनाहि वाटत नव्हतें. ही महत्त्वाची गोष्ट रामायण वाचतांना · सहज दिसून येते. ( उत्तरकांड सर्ग ७१ पहा ) यापुढील रामायणा- च्या गायनाचा प्रसंग रामाच्या दरबारांतील होय. या प्रसंगी तर ही · गोष्ट स्पष्टच पुढे आली आहे. या वेळी रामानें अश्वमेध आरंभिला होता व त्याकरितां आपल्या शिष्यांसह महर्षि तिकडे गेले होते. • रामायणाचा प्रसार करून राजपुत्रांना व त्यांच्या मातेला उघड

माथ्यानें राजाच्या ताब्यांत देण्यास हा प्रसंग चांगला होता. अश्वमे-

' घासाठी देशांतील मोठमोठे लोक एकत्र झाले होते. त्या सर्वांना राम- · चरित्र कळण्यासाठी ज्या ठिकाणीं यज्ञ चालला होता त्या ठिकाणीं • रामायण गाण्याची वाल्मीकींनीं राजपुत्रांना आज्ञा केली. या वेळचे महर्षीच्या तोंडचे श्लोक पुढें दिले आहेत:- -- · रामस्य भवनद्वारि यत्र कर्म च कुर्वते । ऋत्विजामग्रतश्चैव तत्र गेयं विशेषतः ॥ ७१९३॥६॥ यदि पृच्छेत्स काकुत्स्थो युवां कस्येति दारकौ । वाल्मीकेरथ शिप्यौ द्वौ ब्रूतमेवं नराधिपम् ॥ १२ ॥ आदिप्रभृति गेयं स्यान्न चावज्ञाय पार्थिवम् । पिता हि सर्वभूतानां राजा भवति धर्मतः ॥ १४ ॥ वाल्मीकीच्या या आज्ञेवरून राजपुत्रांना त्यांनी कसे वागविलें होतें व आपण वाल्मीकींचे शिष्य आहों यापलीकडे त्यांना वास्त- विक माहिती किती दिली होती हें स्पष्ट होतें. शेवटच्या श्लोकांत तर राजाची कोणत्याहि रीतीनें अवज्ञा करूं नका, असे सांगतांना · महर्षि सांगतात की, मुलांनो, राजा हा धर्मतः सर्व लोकांचा पिता 66