पान:रामायणनिरीक्षण.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६८ रामायणनिरीक्षण. झाली व या गैरसमजामुळें बराच घोंटाळा झाला. वास्तविक, रामाय-- णाची समाप्ति उत्तरकांडाच्या शेवटींच केलेली आहे. आतां, युद्धक संपविल्यावर बऱ्याच कालानें उत्तरकांड लिहिले ही गोष्ट खरी आहे.. तथापि, युद्धकांडाच्या शेवटीं रामायणाची समाप्ति करण्याचा कवीचा हेतु होता, असें मात्र दिसत नाहीं. हें कसें तें पुढील कथेवरून दिसेल. रामायण लिहिलें त्या वेळीं रामाचे पुत्र वाल्मीकीं- च्या आश्रमांत मोठे झाले होते हैं वर लिहिलेंच आहे. या पुत्रांना व त्यांच्या पुण्यशील मातेला राजाकडे नेऊन पोंचविण्याचे कार्य महषींना करावयाचें होतें. शिवाय, हें कार्य लोकांतील गैरसमज दूर करून करावयाचें होतें. लोकांतील गैरसमज दांडगे उपाय योजून कधीहि जात नाहींत आणि तसे उपाय योजावयाचे नव्हते लणूनच रामानें सीतेचा त्याग केला होता. हा गैरसमज दूर करण्यास एकच उपाय होता व तोच महषांनी योजिला. हा उपाय ह्मटला ह्मणजे रामाच्या पवित्र चरित्राचा प्रसार करून सीतेचें पावित्र्य लोकांस पटविणें हा होय; परंतु, याहि उपायाला एकच अडचण होती, रामाचे पुत्र हे कांहीं सामान्य नव्हते. त्यांना आपल्या आईचा पित्यानें निष्कारण त्याग केला ही गोष्ट कळली तर ते स्त्रस्थ कसे बसणार ? ते कांहीं तरी खटपट केल्यावांचून स्वस्थ राहिले नसते. बाकी, लोकांत जी कथा प्रचलित आहे तींत तर ही खटपट होऊन पितापुत्रांचें युद्धहि झालें आहे ! परंतु महबींना ही कल्पना नको होती. यासाठी त्यांनी ही गोष्ट न कळेल अशा रीतीनें वागविलें व हा संबंध न कळेल इतकेंच रामायण त्यांना पढविलें. शत्रुघ्न मथुरेहून रामाला भेटावयास आला त्यावेळी तो वाटेंत वाल्मीकींच्याच आश्रमांत उतरला होता. त्यावेळीं तो व त्याचे सर्व सैनिक यांपुढें वाल्मीकींनी राजपुत्रांकडून रामायण गाऊन दाखविलें. हें गायन ऐकून सर्व सैनिकांना आनंद झाला. परंतु