पान:रामायणनिरीक्षण.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मानंत प्रकरण ६ वें. पनालय, ८८ तो वाचला पाहिजे. नाहीं तर रामायणांतील कथा व आपले पूर्वग्रह यांच्या खडाजंगीत मनुष्य बेजार होऊन जातो. असो. प्रस्तुत वादाचा मुद्दा सिद्ध करण्यास रामायणाच्या प्रारंभाकडे आपण पाहूं. रामाचा जन्म होण्यापूर्वी वाल्मीकींनीं रामायण रचून ठेविलें होतें, अशी सम- जूत आहे; परंतु, खुद्द वाल्मीकि ही गोष्ट सांगत नाहींत. तर रामाचें राज्य चालू असतां रामायण रचिल्याची ते स्पष्ट कबुली देतात. रामा- यणाचा प्रारंभच असा आहे कीं वाल्मीकींनी नारदमुनींना " सांप्रत सर्व लोकांत गुणवान् पुरुष कोण आहे " असा प्रश्न विचारला असतां त्यांनीं रामाचें नांव सांगितलें व तो श्रेष्ठ कसा हे दाखविण्याकरितां त्याच्या चरित्रांतील कथा क्रमानें सांगितल्या. रामाला राज्याभिषेक होईपर्यंतचा या कथांत वृत्तांत आला आहे व या राज्यांत लोक सुखी राहतील ही ओघानेंच सिद्ध होणारी भविष्यकालांतील कथा नार- दाच्या भाषणांत आहे. यानंतर ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून नारदांनीं सांगितलेली कथा वाल्मीकींनी छंदोबद्ध केली. ज्या वेळीं ही गोष्ट घडून आली त्या वेळी सीता आपल्या दोन मुलांसह वाल्मीकी- च्याच आश्रमांत होती वहीं दोन मुले मोठीं— सुमारे बारा वर्षांचीं झालीं होतीं. त्यांचें या वेळीं वेदाध्ययन झालें होतें, असें रामायणांत स्पष्ट लिहिले आहे. यांना वाल्मीकींनीं रामायण पढविलें. वाल्मीकांनी कुशलवांना सांगितलें तें रामायण किती होतें, हाच खरोखर वादाचा मुद्दा होय व ही गोष्ट प्रो० परांजपे यांच्या निबंधांत एके स्थली ओघानेंच बाहेर आली आहे. ( पान ३८ ) युद्धकांडाच्या शेवटीं जे फलश्रुतीचे प्रक्षिप्त श्लोक आहेत त्यांचें खरें स्वरूप प्रो० परांजपे यांना न कळल्यामुळें वाल्मीकींनींच ही समाप्ति केली असावी व पुढील भाग यांनी मागून लिहिला असावा, अशी त्यांची समजूत