पान:रामायणनिरीक्षण.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामायणनिरीक्षण, त्यावेळीं घडली होती. यावरून राज्याभिषेकापर्यंतचेंच रामचरित्र नारदांच्या तोंडी घातलें आहे तें योग्य आहे असें कोणासहि दिसून येईल. ( नारदाची ) वरील अनुक्रमणिका व ( बालकांडाच्या ति- सया सर्गातील ) दुसरी अनुक्रमणिका यांची समाप्ति राज्याभिषेकापर्यंत कां झाली याचें कारण एकच असून ते वर दिले आहे. या दुसऱ्या अनुक्रमणिकेत मात्र • वैदेयाश्च विसर्जनम्' असा उत्तरकांडांतील एका कथेचा उल्लेख आला आहे, परंतु प्रो. परांजपे यांनीं तो संशया- स्पद ठरविला आहे. पूर्वीची अनुक्रमणिका नारदांनी सांगित- लेल्या कथेची होती व दुसरी अनुक्रमणिका वाल्मीकींची आहे. यामुळे नारदांनी सांगितलेल्या कथेपुढील वाल्मीकींना माहीत असलेली सीतात्यागाची कथा मात्र त्यांत दर्शित केली आहे; या पुढील कथा त्यावेळीं व्हावयाच्या असल्यामुळे त्या दुसऱ्या अनुक्र- मणिकेत अनुक्रांत नाहींत. प्रो. परांजपे यांच्या लक्षांत ही गोष्ट न आल्यामुळे त्यांनीं दुसया अनुक्रमणिकेंतील सीतात्यागाविषयींच्या उल्लेखांवर उगाच हल्ला केला आहे." रा. पाटणकर यांनीं - - प्रो. परां- जपे यांच्या सर्वहि प्रमाणांची तपासणी करून पाहिल्यानंतर शेवटीं असा समारोप केलेला आहे:- • “ याप्रमाणें प्रो० परांजपे यांच्या अठराहि प्रमाणांनी त्यांचा मुद्दा सिद्ध होत नाहीं, ही गोष्ट सिद्ध झाली आहे. आतां वादाचा मुद्दा दुसन्या कोणत्या रीतीनें सिद्ध होतो हें पाहूं. प्रो० परांजपे यांच्या शब्दांत थोडा फेरफार केल्यावर त्यांचा सिद्धांत मला मान्य आहे हें मीं प्रारंभींच लिहिले आहे. रामायणाच्या बाबतींत विचार करावयाचा म्हटला ह्मणजे लोकांत रामचरित्राविषयीं असलेल्या समजुती मनांतून साफ काढून टाकणें जरूर आहे. वाल्मीकिरामायण हा एक आपणांस पूर्वी माहीत नसलेला अपूर्व ग्रंथ आपण वाचीत आहों अशा बुद्धीनें