पान:रामायणनिरीक्षण.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ६ थें. ६५ मेघांत रामासमोर जे रामचरित्र म्हणाले, त्यांत उत्तरकांड असणें शक्य नाहीं. याप्रमाणें, रामाच्या समकालीन अशा वाल्मीकीने प्रथम पट्कां- डात्मक व नंतर सप्तकांडात्मक रामायण रचिलें. असो. •:•: अलीकडे प्रो. शिवराम महादेव परांजपे यांनी रामायणाविषयों कांहीं विचार ह्मणून एक निबंध छापलेला आहे. या निबंधांत त्यांनीं - वाल्मीकीनें पूर्वीचें षट्कांडात्मक रामायण लिहिल्यानंतर तेथें ग्रंथसमाप्ति करून मग कांहीं कालानें उत्तरकांड रचिलें असा मुद्दा प्रतिपादन केलेला आहे. या मुद्यांत थोडासा फरक केल्यास तो कोणासहि मान्य होण्यासारखा आहे; परंतु हा मुद्दा त्यांनी ज्यां आठरा प्रमाणांवर उभारला आहे त्यांपैकी बहुतेक प्रमाणे कशीं अग्राह्य आहेत, हें रा. रघुनाथ कृष्ण पाटणकर यांनी प्रो. परांजपे व वाल्मी- किरामायण या मथाव्याचे दोन लेख केसरीत लिहून सिद्ध करून दाखविलें आहे. ( ता. २४ सेप्टेंबर व १ आक्टोबर १९१२ चे अंक पहा. ) रा. पाटणकर यांचे विवेचन मार्मिक असून त्यांची विचारसरणी बरोबर आहे. विवेचनाच्या ओघांत त्यांनी असे दाख- विले आहे कीं, "नारद व वाल्मीकि यांमधील या संवादाचा (१ - १ ) काळच असा होता की त्यावेळी उत्तरकांडांतील कथा घडून आली नव्हती. ' सांप्रत सर्व लोकांत गुणवान् कोण आहे' या वाल्मीकी- च्या प्रश्नाला उत्तर ह्मणून नारदांनीं रामचरित्र सांगितलें. यावेळीं रामाचें राज्य चालूं असून सीता वाल्मीकीच्याच आश्रमांत आपल्या दोन मुलांसह होती, ह्म. उत्तरकांडांतील सीतात्याग ही एकच गोष्ट रामायणरचनेविषया इतर ग्रंथांत काय हकीकत मिळते याविषयीं परिशिष्ट पहा. १