पान:रामायणनिरीक्षण.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६४ प्रकरण ६ वें. निघाला; यामुळे ब्रह्मचास हा चांगला काव्य करील असे वाटून त्यानें वाल्मीकीस श्लोकबद्ध रामचरित्र तयार करावयास सांगितलें. पण विस्तृत साधनें कशीं मिळतील या विवंचनेत वाल्मीकिऋषि पडून तो लानाहून आश्रमाकडे परत येऊं लागला. ( ३ ) इतक्यांत रामाज्ञेनें लक्ष्मणानें वनांत सोडून दिलेली सीता रडत होती, तिकडे वाल्मीकि गेला. त्यानें आपली ओळख तिला सांगितली; व ती रामाची स्त्री आहे हे जाणून घेतलें. सीता वाल्मी- कीच्या आश्रमांत राहण्यास गेली. नांवें ( ४ ) पुढें तीस पांच महिन्यांनी दोन जुळी मुले झाली; त्यांची वाल्मीकीन कुश व लव अशीं ठेविलीं. हीं मुले वारावर्षीची झाल्यानंतर वाल्मीकीने त्यांचें उपनयन करून, त्यांस आपण सीते- च्या प्रसूतीनंतर या बारा वर्षांच्या अवकाशांत केलेले रामच- रित्र पाठ लणावयास शिकविलें. ( ५ ) या रामचरित्रास प्रथम त्यानें पौलस्त्यवध असे नांव ठेविलें असावें; यांत ५०० सर्ग बहुधा असावेत. नांवावरूनच राम रावणास मारून परत राज्यारूढ होईपर्यंतची हकीकत त्यांत असावी; ह्मणजे हैं रामचरित्र सध्यांच्या सहाकांडांचंच असावें. ( ६ ) हें रामचरित्र त्यानें अयोध्येत अश्वमेवयज्ञ चालला असतां • कुशलवांकडून प्रसिद्ध करविलें; पुढे लवकरच राम निजधामास गेला. रामास या रामचरित्रामुळेच कुश व लव हीं आपली मुले आहेत असे कळलें. ( ७ ) राम निजधामास गेल्यानंतर वाल्मीकीनें रामाच्या पुढील हकीकतीचें उत्तरकांड नांवाचें सातवें कांड रचून, त्या ग्रंथास मिळून रामायण हैं नांव बहुधा दिलें. कुश व लव एकंदर अश्वमे-