पान:रामायणनिरीक्षण.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामायणनिरीक्षण, नाला, “ तत्र पंचशतरूपसर्गसंख्या षट्कांडानामेव; लोकसंख्या तु सोत्तराणामित्याहुः ।” हें वरोबर दिसतें . हैं महेश्वरतीर्थ नामक टीका- काराचें मत होतें. वाल्मीकीनें मूळचें रामचरित राम राज्यावर बसल्यानंतरच लि- हिलें, याला आणखी एक श्लोक प्रमाण आहे:- १ 1 माप्तराज्यस्य रामस्य वाल्मीकिर्भगवानृषिः । चकार चरितं कृत्स्नं विचित्रपदं अर्थवत् ।। १-४-१ ॥ कदाचित् यास त्यानीं प्रथम ' पौलस्त्यवध' असें नांव ठेवि- लेले असावें: - काव्यं रामायणं कृत्स्नं सीतायाश्चरितं महत् । पौलस्त्यवधमित्येवं चकार चरितव्रतः ॥ १-४-७॥ पण नंतर उत्तरकांड जेव्हां त्यानें रचिलें तेव्हां रामायण हें नांव ग्रंथास देण्याचे त्यास सुचले असावें:-- -- एतावदेतदाख्यानं सोत्तरं ब्रह्मपूजितम् । रामायणमिति ख्यातं मुख्यं वाल्मीकिना कृतम् ॥ १॥ उत्तरकांड, सर्ग १११ वा. वरील सर्व विवेचनावरून ज्या गोष्टी सिद्ध झालेल्या आहेत त्या क्रमानें खाली देतों :- - ( १ ) वाल्मीकि व नारद यांचा संवाद झाला तेव्हां राम राव- णास मारून येऊन अयोध्येस राज्य करीत होता; पण त्यानें अझून अश्वमेधयज्ञास सुरवात केली नव्हती. ( २ ) नारदाकडून संक्षिप्त रामचरित्र ऐकल्यानंतर वाल्मीकि तमसानदींतील अकर्दम तीर्थात स्नानास गेला; इतक्यांत तेथें व्याधानें क्रौंचवध केला. त्यास वाल्मीकानें जो शाप दिला तो श्लोकरूपच 17 MAR 1990