पान:रामायणनिरीक्षण.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ६ वें. अश्वमेधापूर्वी संपूर्ण केलेल्या ग्रंथांत वाल्मीकीनें अश्वमेधा- नंतरची हकीकत कशी आधींच देऊन ठेविली ? ही एक ऐति- हासिक अंडचण आहे. पण हे श्लोक रामायणाच्या सद्यःस्वरूप कर्त्यानें एथें घातले असावेत, असे मला वाटतें. कारण उत्तरकांडांत बाल्मीकी कोठेंहि भविष्यत्कालीन प्रयोग केलेला नाहीं; इतकेंच · नव्हे, तर अश्वमेधयज्ञांत जानकी गडप झाल्यानंतर, राम फार दिवस कांहीं राज्यावर नव्हता; तेव्हां राम निजधामास गेल्यानंतरच उत्तरकांड वाल्मीकीनें रचिलें असावें; म्हणजे ऐतिहासिकदृष्ट्या पाहतां, रामाच्या अश्वमेधांत है उत्तरकांड कुशालवांनीं ह्मणणे अशक्य आहे; कारण हें नंतर बनलेले असले पाहिजे हें उघड आहे. दुसऱ्या एका गोष्टीच्या आधारानेंहि हीच गोष्ट उघड होते. युद्धकांडाच्या अखेरीस, ६२ “ इतिश्रीगोमतीतीर. .श्रीरामात्मजयोः आदिकवेः शिष्ययोः कुशलवयोराख्याने श्रीमद्वाल्मीकीये आदिकाष्ये श्रीमद्रामायणे चतुर्वि- शत्सहस्रिकायां संहितायां श्रीमद्युद्धकांडे पंचविंशेऽन्हि वर्तमानक- थाप्रसंगः समाप्तः ।। " या प्रकारचा उल्लेख आहे; म्हणजे युद्धकांड संपविण्यास कुश- लवांस २५ दिवस लागले; म्हणजे युद्धकांड अखेरपर्यंत कुश लवांनी म्हटलेल्या रामचरितांत २५ x २० =५०० सर्ग होते. ह्मणजे कुशलवांनीं रामाश्वमेधांत गाऊन दाखविलें तें रामचरित्र ( ५०० सर्गीचें ) युद्धकांडास संपलें ! मग त्यावेळी २४००० · श्लोक होते कीं नाहीं, हें आज कळण्यास कांहीं साधन नाहीं. म्हणजे युद्धाकांडानंतरचें उत्तरकांड कुशलवांनीं रामाश्वमेधांत गाऊन दाखविलें नाहीं. याविषयीं, रामटीकाकारानें बालकांडाच्या चौथ्या -सर्गातील श्लोकावर टीका करितेवेळी असे म्हटले आहे कीं: -