पान:रामायणनिरीक्षण.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामायणनिरीक्षण. [ पुढील दिवशीं, रामानें वाल्मीकीकडून सीता शुद्ध आहे असें ऐकून तिजला आणविलें, व तिनें शपथ केल्याबरोबर भूमातेनें तिला विवर देऊन गडप केलें ! नंतर रामानें कांहीं फार दिवस राज्य केलें नाहीं. असो. ] सीतेविषयीं राम शोक करीत असतां, ब्रह्मदेव त्यास ह्मणतो कीं:- एतदेव हि काव्यं ते काव्यानांमुत्तमं श्रुतम् । सर्वे विस्तरतो राम व्याख्याम्यति न संशयः ॥ १६ ॥ जन्मप्रभृति ते वीर! सुखदुःखोपसेवनम् । भविष्यदुत्तरं चेह सर्वे वाल्मीकिना कृतम् ॥ १७ ॥ आदिकाव्यमिमं राम त्वयि सर्व प्रतिष्ठितम् ॥ १८ ॥ शेषं भविष्यं काकुत्स्य काव्यं रामायणं शृणु । उत्तरं नाम काव्यस्य शेषमंत्र महायशाः ॥ २० ।। तच्छ्र णुष्व महातेज ऋषिभिः सार्धमुत्तमम् ॥ २१ ॥ उत्तरकांड. अ. ९८ वा. याप्रमाणें ब्रह्माने सांगितल्यानंतर रामानें पुढील होणारा भाग ऐकिला:-- ततः समुपविष्टेषु महर्षिषु महात्मसु । भविष्यदुत्तरं काव्यं जगतुस्तौ कुशीलवौ ।। ७.९९.२ ॥ यावरील ६ श्लोकांत मात्र बाल्मीकीनें रामाच्या अश्वमेधापुढची हकीकत देखील आधींच लिहून ठेविली होती, अशी समजूत आढळते... प्र १ या श्लोकांत 'काव्यानामुत्तमं 'आदिकाव्य ' बगैरे शब्द ज्या अर्थी आलेले आहेत, त्या अर्थी ते इतर काव्यें निर्माण झाल्यानंतरचे अत एव आर्प नसावेत असे वाटते. वाल्मीकींचं जेव्हां एकच काव्य होतें, तेव्हां त्यास आदिकाव्य ह्मणण्याचे कारण तरी काय ? हेंच कळणे कठिण आहे. >