पान:रामायणनिरीक्षण.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
६०

प्रकरण ६ वें. याप्रमाणें पहिल्या दिवसाचा क्रम संपला; पहिल्या नारददर्शित सर्गापासून २० सर्ग संपले. तेव्हां राम संतुष्ट होऊन प्रत्येकास १८००० सोन्याची नाणीं देऊं लागला; पण ती त्यांनी घेतली नाहीत. नंतर - रामानें त्यांस प्रश्न केला कीं: किं प्रमाणमिदं काव्यं का प्रतिष्ठा महात्मनः । कर्ता काव्यस्य महतः छ चासौं मुनिपुंगवः ॥ मुलांनी उत्तर दिलें कीं:- वाल्मीकिर्मगवान् कर्ता संप्राप्तो यज्ञसंविदम् । - येनेदं चरितं तुभ्यं अशेषं संप्रदर्शितम् || २४ || संनिबद्धं हि श्लोकानां चतुर्विंशत्सहस्रकम् । उपाख्यानशतं चैव भार्गवेण तपस्विना ॥ २५ ॥ आदिप्रभृति वै राजन् पंचसर्गशतानि च । कांडानि षट् कृतानीह सोत्तराणि महात्मना ॥ २६ ॥ याप्रमाणे पहिल्या दिवशीं रामानें त्या ग्रंथाविषयों माहिती ऐकून • घेतली. पुढे राम पुष्कळ दिवसपर्यंत हे काव्य ऐकत होता असे झटले आहे. :- 1- रामो बहून्यहान्येव तद्गीतं परमं शुभम् ॥ शुश्राव; ॥ ७.९५. १ ॥ अर्थात् त्यानें हें काव्य-त्यांत जर ५०० सर्ग असले तर २५ दिवसपर्यंत ऐकिलें असले पाहिजे, हैं उघड होतें. या काव्यानेंच रामास कुश व लव हीं आपली मुले आहेत हे कळून आलें. असो. या प्रकारें वाल्मीकिऋषीनें रचिलेले रामचरित्र त्यांनीं रामाच्या अश्वमेधयज्ञांत प्रसिद्ध केलें. ●"