पान:रामायणनिरीक्षण.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामायणनिरीक्षण. याप्रमाणें कुश व लव हे आपले गीत गात चालले असतां सर्व- लोक अयोध्येस त्यांची, व ते ह्मणत होते त्या रामचरिताची स्तुत करूं लागले. अहो गीतस्य माधुर्य लोकानां च विशेषतः ॥ १७ ॥ चिरनिर्वृत्तमप्येतत्प्रत्यक्षमिव दर्शितम् ॥ १८ ॥ ( बालकांड, अ. ४ था. ) ऋपींनीं या मुलांस पुष्कळ प्रकारचीं बक्षिसे दिली. असे होता होतां ही वर्दी राजापर्यंत गेली; मग रामानें त्यास आपल्या यज्ञांत ( सर्व ऋषि व राजे वगैरे जमले होते त्याठिकाणीं) पहिल्यापासून म्हणण्यास सांगितलें. प्रशस्यमानौ सर्वत्र कदाचित्तत्र गायकौ ॥ २८ ॥ रथ्यासु राजमार्गेषु ददर्श भरताग्रजः । स्ववेश्म चानीय ततो भ्रातरौ स कुशीलवों ॥ २९ ॥ पूजयामास पूजार्है रामः शत्रुनिबर्हणः । बाल. सर्ग ४ था याप्रमामाणे रामानें सन्मान करून नेऊन त्यांजकडून रामचरित्र ऐकण्यास सुरवात केली; सुरवातीला मंडळी गलबला वगैरे करीत होता तो पुढें बंद झाला. अशावेळीं मुलांनीं रामचरित्र म्हणण्यास सुरवात केली :-. एवं प्रभाषमाणेषु पौरजानपदेषु च । प्रवृत्तं आदितः पूर्व सर्गे नारददर्शितम् ।। १५ ।। ततः प्रभृति सर्वांश्च यावद्विशत्यगायताम् ॥ १६ ॥ उत्तरकांड. अ. ९४.