पान:रामायणनिरीक्षण.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ६ वें. झाल्यानंतर त्यास आपण रचिलेलें रामचरित्र मुलांकडून ह्मणवून दाखवून, त्याचें मनोरंजन केलें:— स भुक्तवान्नर श्रेष्ठो गीतमाधुर्यमुत्तमम् । शुश्राव रामचरितं तस्मिन् काले तथाकृतम् ॥ १४ ॥ तंत्रलियसमायुक्तं त्रिस्थानकरणान्वितम् । संस्कृतं लक्षणोपेतं समतालसमन्वितम् ॥ १५ ॥ शुश्राव रामचरितं तस्मिन् काले पुराकृतम् । तान्यक्षराणि यथावृत्तानि पूर्वशः ॥ १६ ॥ उत्तराकांड, अ ७१ वा. यावरून कुशलवांच्या जन्मानंतर बारावर्षांच्या आंत वाल्मीकीचें रामचरित तयार झालें होतें, हें उघड होतें. रामचरित पुढे कसे व कोठें प्रसिद्ध करण्यांत आलें, हें आपण आतां पुढें पाहूं:- - उत्तरकांडाच्या ९३ व्या अध्यायांत अयोध्येत राम अश्वमेध यज्ञ करित असतां वाल्मीकि आपले दोन्ही शिप्य कुश व लव यांस घेऊन आला होता, असे म्हटले आहे. त्यानें कुशलवांस रामायण गात जाण्यास ( शहरभर ) आज्ञा केली, कोणी 'तुझी कोण' असें विचारल्यास ' आपण वाल्मीकिऋषीचें शिष्य आहों' असे सांगण्यास त्यांस सांगून ठेविलें; व रोज २० सर्ग ह्मणत जाण्यास सांगितलें. स शिप्यौ अब्रवीत् हृष्टौ युवां गत्वा समाहितौ । कृत्स्नं रामायणं काव्यं गायतां परया मुदा ॥ ४ ॥ दिवसे विंशतिः सर्गाः गेया मधुरया गिरा | प्रमाणैर्बहुभिस्तत्र यथोद्दिष्टं या पुरा ॥ १० ॥ उत्तरकांड, अ. ९३