पान:रामायणनिरीक्षण.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामायणनिरीक्षण. ५७ याप्रमाणें वाल्मीकीस रामचरित्राच्या साधनांचा एक जीवंत कोशच प्राप्त झाला! मग काय विचारतां? तेव्हां सीता पांच महिन्यांची गरोदर होती. पुढें ती यथाकाली प्रसूत झाली. प्रसूत झाल्यानंतर किंवा गरोदर- पणींच सीतेनें आपली सर्व हकीकत वाल्मीकीस सविस्तरपणे सांगितली असेल. ( परिशिष्ट ४ थें पहा ) त्याच्या योगानें बाल्मीकीनें प्रथम रामचरित्र रचिलें. हें रामचरित्र सीताप्रसूतीच्या काळीं कांहीं तयार झालें नव्हतं. कारण, शत्रुध्न लवणवधासाठीं अयोध्येहून निघाला असतां वाटेंत वाल्मीकीऋषीच्या आश्रमांत उतरलेला होता; तो ज्या रात्रीस तेथें राहिला होता त्याच रात्रीस सीता प्रसूत होऊन तीस दोन पुत्र झाले :- यामेव रात्रिं शत्रुघ्नः पर्णशालां समाविशत् । तामेव रात्रिं सीताऽपि प्रसूता दारकद्वयम् ॥ ७.६६.१ ।। यावेळी जर वाल्मीकीचें रामचरित्र तयार झालें असतें ( ४-५ महिन्यांत तें तयार होणे शक्यच नव्हतें ) तर त्यानें तें शत्रुघ्नास दाखविलें असतें; पण इतक्यांत तें तयार झालेले नव्हते. अन साधनांची जुळवाजुळव व रचना हीं चाललीं होतीं. शत्रुघ्न लवणाला मारून, मथुरानगरी स्थापून, तींत बारीवर्षे राहून नंतर जेव्हां पुनः अयोध्येस परत जाण्याकरितां निघाला, तेव्हां मुलेह अर्थात् १२ वर्षांची झाली होतीं; व उपनयनानंतर वाल्मीकीनें त्यांस आपले रामचरित्र पाठ म्हणण्यास शिकवून ठेविलें होतें. वाल्मीकीनें लवण- राक्षसास मारिल्याबद्दल शत्रुघ्नाचें अभिनंदन नरून त्याचें जेवण वगैरे ( १ ) ततो द्वादशमे वर्षे शुत्रघ्नो रामपालिताम् | अयोध्यां चकमे गंतुं अल्पभृत्यबलानुगः । ७.७.१०१ ।। द्वादशैतानि वर्षाणि त्वां विना रघुनंदन | नोत्सयेयं अहं वस्तुं त्वया विरहितो नृप ॥ ७.७२.११ ॥