पान:रामायणनिरीक्षण.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५६ प्रकरण ६ वें. क्रौंचवध होऊन वाल्मीकि ध्यानस्थ होऊन परत येतेवेळी रामानें सीतेचा त्याग केलेला होता. हीच विधीनें रामाच्या चरिघांतील विस्तृत हकीकत वाल्मीकीस कळण्याची व्यवस्था करून ठेविली होती. वाल्मीकीच्या मनांत रामचरित्र कसे लिहावें- तें लिहिण्याला आपल्याजवळ काय साधनें आहेत — अशी चिंता उत्पन्न होऊन तो आश्रमाकडे परत निघावयाला-व सीतेची तशा स्थितींत त्यास अकस्मात् भेट व्हावयाला ( कारण, लक्ष्मणानें तिला वाल्मीकि ध्यानस्थ होण्याच्या पूर्वीच वनांत सोडून दिली होती असे दिसते ) एकच गांठ पडली ! ही गोष्ट कालिदासानें नेहमींच्या कवीच्या प्रति- भेनें उत्तम रीतीनें ओळखिली आहे; कारण तो ह्मणतो कीं:- - । तां अभ्यगच्छद् रुदितानुसारी | कविः कुशेध्माहरणाय यातः ॥ निषादविद्धांडजदर्शनोत्थः । लोकत्वमापद्यत यस्य शोकः ।। यावर टीका करतेवेळी मल्लिनाथाचे खालील उद्गार वरील विषयास धरूनच आहेत; तो म्हणतो कीं:- “ कुशेध्माहरणाय यातः कविः वाल्मीकिः रुदितानुसारी सन् तां सीतां अभ्यगच्छत् अभिगमनं च दयालुतया इति आह-निषादेति तिरश्चामपि दुःखं न सेहे किमुत अन्येषां .... - इति भावः । कालिदासाचा व टीकाकाराचा भाव असा कीं ज्याला पक्ष्याला मारिल्याबद्दल देखिल करुणा उत्पन्न होऊन, ज्यानें व्याधास भयंकर शाप ( पूर्वी नुकतांच ) दिला होता, त्याला मनुष्य रडत असलेले ऐकून कसें पुढें पाऊल टाकवेल ? ह्मणून त्यानें रडण्याच्या स्वराकडेच आपलीं पाउलें वळवून सीतेला गांठलें !