पान:रामायणनिरीक्षण.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

याचनाक रामायणनिरीक्षण. श्लोक १० पासून ३९ अखेरपर्यंत सांगितले आहे. त्यांत युद्धकांडाचा शेवटचा विषय असा सांगून, रामाभिषेकाभ्युदयं सर्वसैन्यविसर्जनम् । पुढील उत्तरकांडाचे विषय असे सांगितले आहेत:- स्वराष्ट्ररंजनं चैव वैदह्याच विसर्जनम् ॥ ३८ ॥ अनागतं च यत्किंचित् रामस्य वसुधातले | तच्चकारोत्तरे काव्ये वाल्मीकिर्भगवान् ऋषिः ॥ ३९ ॥ हे श्लोक केव्हां लटलेले आहेत, हे वाचकांनी लक्षांत आणल्यास, या लोकांचा सरळ अर्थ ते जाणूं शकतील. या श्लोकांनीं वाल्मी- कीनें भविष्यत्कथांचें वर्णन आधींच आपल्या काव्यांत करून ठेविलें होतें, अशी पुष्कळ प्राचीन व अर्वाचीन लेखकांची समजूत होऊन बसली आहे. पण हा सर्व घोटाळा ऐतिहासिक दृष्टीच्या अभावामुळे उत्पन्न झालेला आहे, हें पुढं कळून येईल. वरील सर्व वर्णन किंवा ३८ व ३९ वे लोक, बाल्मीकीनें ( किंवा त्याच्या एकाद्या शिष्यानें बहुधा स्वत: वाल्मीकीनेंच - ) प्रथम सहा कांडे व नंतर उत्तरकांड हीं रचल्यानंतर लिहिलेले आहेत. वाल्मीकि ध्यानस्थ बसला होता तेव्हां अझून राम राज्यावर होता; राम निजधामास गेल्यानंतरच अर्थात् उत्तरकांड वाल्मीकीनें संपविले असावें. या दृष्टीनें जर वरील श्लोकांचें निरीक्षण केलें तर त्याचा सरळ अर्थ असा आहे कीं:- - 66 राष्ट्राचें रंजन, सीतेचा त्याग, व (वाल्मीकि ध्यानस्थ बस- लेल्या वेळीं ) अझून जें जें रामास घडून सभालेले नव्हते, त्या सर्वांचे वर्णन मिळून, नंतर बाल्मीकीनें उत्तरकांड (नंतरचे कांड ) रचन, त्यांत केलें. ” यावरून दुसरा एक सहज उलगडा होऊन जातो की

भोक