पान:रामायणनिरीक्षण.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ६ वें. ततः पश्यति धर्मात्मा तत्सर्वं योगमास्थितः ।

  • पुरा यत्तत्र निर्वृत्तं पाणौ अमलकं यथा ॥ ६ ॥

तत्सर्वं तत्त्वतो दृष्ट्वा धर्मेण स महामतिः ॥ ७ ॥ स यथाकथितं पूर्व नारदेन महात्मना । रघुवंशस्य चरितं चकार भगवान् मुनिः ॥ ९ ॥ (6 श्रांत टीकाकारांनी वगैरे अर्थ घेतल्याप्रमाणे पाहतां, कवीला ध्यानांमध्यें, पूर्वी घडून आलेले सर्व कांहीं प्रत्यक्ष दिसतें कीं काय, असे भासलें व तें सर्व मग त्यानें नारदाच्या कथानुसंधानानें रचिलें ! ही काव्यदृष्टि झाली ! पण ऐतिहासिकदृष्ट्या, वाल्मीकीनें ‘ योगमास्थितः ' ह्मणजे ) खटपट करून, उद्योग करून, साधनें मिळवून, पूर्वी झालेले सर्व वृत्त डोक्यांत आणून पुढे चरित्र लिहिलें, असाच याचा अर्थ होईल ! पण सातव्या लोकांतील ‘ धर्मेण ' या पढ़ाची वाट काय लावावयाची? असा एक प्रश्न उरतोच ! तेव्हां हैं वर्णन काव्यदृष्ट्या असून ऐतिहासिक दृष्ट्या वाल्मीकीनें साधनें मिळविलीं हेंच खरें, हैं पहिल्या श्लोकावरून कळून येईल. असो. वर जें रघुवंशाचें ( रामाचें ) चरित्र वाल्मीकीनें रचिलें असें सांगितले आहे, त्यांत काय काय विषय आहेत हैं तिस-या सर्गाच्या

' सहाव्या श्लोकांतील पुरा शद्रावरून कोणी असे अनुमान काढतात की, वाल्मीकि हा रामानंतर बऱ्याच काळाने झाला; पण ही चूक आहे. कारण, बाल्मीकि ध्यान करीत बसला होता तेव्हां राम राज्याभिषिक्त होऊन काही वर्षे झाली होती. या काळीं रामाचा वनवास, सीताहरण व रावणवध या मागच्याच गोष्टी होत; या ( पूर्वीच्या ) गोटी वाल्मीकीनें • आपल्या प्रतिभेच्या जोरावर प्रत्यक्ष घडत असल्याप्रमाणे पाहिल्या; तेव्हां वरील पुरा शद्वान वाल्मीकि हा रामानंतरचा ठरत नाहीं हे उघड आहे.