पान:रामायणनिरीक्षण.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

14 ८ PRO रामायणनिरीक्षण. पादत्रद्वोऽक्षरैसमुः तंत्रीलयसमन्वितः शोकार्तिस्य प्रवृत्तो मे श्लोको भवतु नान्यथा ॥ १.२.१८॥ इतक्यांत ब्रह्मदेवाने येऊन वाल्मीकीस झटलें की:-- श्लोक एवास्त्वयं बद्धो नात्र कार्या विचारणा । मच्छंदादेव ते ब्रह्मन् प्रवृत्तेयं सरस्वती ॥ ३१ ॥ रामस्य चरितं कृत्स्नं कुरु त्वं ऋषिसत्तम ॥ ३२ ॥ वृत्तं कथय धीरस्य यथा ते नारदात् श्रुतम् || रहस्यं च प्रकाशं च यद् वृत्तं तस्य धीमतः ॥ ३३ ॥ ब्रह्मदेवानें कवित्वाची स्फूर्ति वाल्मीकिऋषींत आहे असे पाहून, व · रामचरित लिहिण्याला जो करुणरसाचा परिपाक असावा लागतो तोहि त्याच्यांत आहे असे ओळखून, नारदाकडून ऐकल्याप्रमाणे तूं राम- चरित लिही, अशी त्यास सूचना केली; पण नारदाने सांगितलेल्या संक्षिप्त साधनानें रामाचें विस्तृत चरित्र बनणार, वाल्मीकीच्या मनीं उत्पन्न झाली, लगेच ब्रह्मदेवानें त्यास सांगितलें कीं, त्याबद्दल तूं कांहीं काळजी करूं नको; मीं तुला ही सर्व हकीकत कळण्याची व्यवस्था करून ठेविली आहे :- यच्चाप्यविदितं सर्वं विदितं ते भविष्यति । न ते वाग नृता काव्ये काचिदत्र भविष्यति ॥ ३६ ॥ आतां रामासंबंधीं विस्तृत हकीकत वाल्मीकीस कळण्याची विधीनें कोणती योजना केली असावी, हाच यापुढचा मुख्य प्रश्न आहे. पण याचाहि काव्यदृष्ट्या व ऐतिहासिकदृष्ट्या पुढे उलगडा होण्याजोगा आहे. " निषादविद्धांडजदर्शनोत्थः लोकत्व- १ याविषयीं कालिदास म्हणतो:- मापद्यत यस्य शोकः ॥ रघु. १४-७० ॥ "