पान:रामायणनिरीक्षण.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५० प्रकरण ६ थें. त्याच्या स्वप्न देखील, आपण त्याच विषयावर एक १४००० लोकांचें मोठें मनोहर काव्य रचूं — ही कल्पनाही आली नसेल ! पण विधिघटना कांहीं वेगळीच होती ! हें रामायणाचें बीज ऐकिल्यानंतर गंगानदीजवळच असलेल्या तमैसानदीच्या कांठीं वाल्मीकि आप- ल्या भरद्वाज नामक शिप्याबरोबर अकर्ट्स तीर्थामध्यें स्नान करण्यास गेला. इतक्यांत तेथें जवळील झाडावर काममोहित झालेल्या क्रौंच मिथुनापैकी एका क्रौंचास एका व्याधानें मारिलें, याकडे वाल्मीकीचें लक्ष गेलें; अशा स्थितींत व्याधानें त्या क्रौंच पक्ष्यास मारिलें हैं पाहून वाल्मीकीची हृदयवृत्ति उचंबळली व त्याच्या मनीं त्या क्रौंच पक्ष्या- बद्दल कारुण्य उत्पन्न झालेंः---- तथाविधं द्विजं दृष्ट्वा निषादेन निपातितम् । ऋषेधर्मात्मनस्तस्य कारुण्यं समपद्यत ॥ १. २.१३ ॥ या करुणारसाच्या भरांत त्यानें त्या व्यावास असा शाप दिला कीं:- माँ निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः । यत्क्रौंचमिथुनादेकमवधीः काममोहितम् ॥ शाप देतेवेळीं तो श्लोकरूप निघेल असें कोणासच वाटले नव्हतें ! पण साहजिक वाल्मीकीच्या तोंडून वरील जो उद्गार निघाला तो श्लोकरूपच झाला. वाल्मीकीला देखील याचें आश्चर्य वाटलें; तो आपल्या शिप्यास ह्मणालाः-- १ खरोखर, पुढे ब्रह्मदेवानेंच वाल्मीकीस काव्यरचना करण्याचा आग्रह केलेला आहे. २ ही सभ्यांची गंगेस मिळणारी 'तान्सा ' नदी होय ! 1 ३ हा श्लोक संस्कृत व्यवहारिक काव्यापैकी व वाझ्यापैकी पहिला आहे. या याचें ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्व आहे. वाल्मीकि हा आद्यकवि असून आद्य कवीचा पुनः हा आद्यश्लोक आहे.