पान:रामायणनिरीक्षण.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ६ थें. वाल्मीकीच्या शिप्यांना आपल्या गुरूच्या तोंडूनः अशा चम- त्कारिकरीतीनें श्लोकाची प्रवृत्ति झालेली पाहून सानंद आश्चर्य वाटलें:- मुहुर्मुहुः श्रीयमाणाः प्राहुच भृशविस्मिताः । समाक्षरैः चतुभिर्यः पादैगतो महर्षिणा || सोऽप्यनुव्याहरणाद्भूयः शोकः श्लोकत्वमागतः ॥ ४० ॥ ब्रह्मचानें वर लिहिल्याप्रमाणें वाल्मीकीस रामाचें चरित्र लिहिण्या -- बद्दल सूचना केल्यानंतर वाल्मीकीसहि आपण तसे करावें असे चारूं लागलें:- ५२ तस्य बुद्धिरियं जाता महर्भावितात्मनः । कृत्स्नं रामायणं काव्यं ईदृशैः करवाण्यहम् ॥ ४१ ॥ असा विचार करून त्यानें काव्य निर्माण केलें; त्याचें वर्णन असें आहे :- उदारवृत्तार्थपदैमनोरमैः तदास्य रामस्य चकार कीर्तिमान् । समाक्षरैः श्लोकशतैर्यशस्विनो यशस्करं काव्यमुदारदर्शनः ॥४२ बालकांडाच्या दुसऱ्या सर्गातील वरील दोन लोकांवरून रा० अ- भ्यंकर यानीं अर्से बरोबर अनुमान काढिलें आहे कीं, वाल्मीकीनें मूळ जें रामायण रचिले ते सर्व अनुष्टुभ् श्लोकांतच असावें. कित्येक सर्गाच्या शेवटीं हल्लीं जे विविध मोठाल्या वृत्तांचे श्लोक मिळतात, ते मूळच्या रामायणांत नसून सर्गबंध काव्याची व्याख्या पूर्ण करण्या- करितां ते नंतर कोणी तरी जोडिले असावेत. ही कल्पना खरी दिसते; कारण, हल्लींहि रामायणांत कित्येक असे सर्ग आढळतात की ज्यांच्या शेवटीं इतरवृत्तांचे श्लोक नसून, जे अथपासून इतिपर्यंत अनुष्टुभांतच रचिलेले आहेत; शिवाय अशा इतरवृत्तांच्या श्लोकांची पुनरुक्तिहि रा-